Join us

लग्नाआधीच गरोदर राहिलेल्या अभिनेत्री

By admin | Published: February 01, 2016 12:00 AM

महिमा चौधरी - परदेस फेम महिमा चौधरीने २००६ साली बॉबी मुखर्जीशी एका खासगी समारंभात लग्न केलं. लग्नानंतर अवघ्या ...

महिमा चौधरी - परदेस फेम महिमा चौधरीने २००६ साली बॉबी मुखर्जीशी एका खासगी समारंभात लग्न केलं. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांच्या आतच तिने एका गोड मुलीला जन्म दिला. महिमाची अफेयर्स आणि ब्रेकअप्स खूप गाजली त्यांची चर्चाही झाली पण तिच्या लग्नाची बातमी सर्वांसाठीच धक्कादायक होती.

सेलिना जेटली - सेलिना जेटलीनेसुद्धा इतर सेलिब्रिटींप्रमाणे गुपचुप लग्न केले होते. सेलिनाने जुलै २०११ मध्ये हॉटेल व्यवसायी पीटर हॉगबरोबर लग्न केले होते. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे मार्च २०१२ मध्ये तिने जुळ्या मुलांना जन्म दिला.

अमृता अरोरा - बॉलिवूड अॅक्ट्रेस अमृता अरोराने अचानक लग्नाचा निर्णय घेतल्यामुळे खूप चर्चा झाली होती. मात्र शकील लडाकसोबत डेटिंग करत असताना अमृताला दिवस गेल्याने त्यांनी घाईघाईत आपले लग्न उरकले.

कोंकणा सेन शर्मा - अतिशय गुणवान अभिनेते असलेले कोंकणा शर्मा आणि रणवीर शौरी बराच काळ एकमेकांना डेट करत होते. २०१० साली त्यांनी लग्न केले आणि आपण आई-बाबा बनणार असल्याची घोषणा केली. २०११ च्या सुरूवातीलाच कोंकणाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र लग्नाच्या काही वर्षांनंतर रणवीर-कोंकणाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

सारिका - कमल हासन विवाहीत असतानाही सारिका त्याच्या प्रेमात पडली. त्याने पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर सारिका व तो लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहू लागले आणि सारिका गरोदर राहिली. लग्नाआधीच सारिकाने श्रुती हसनला जन्म दिला होता. श्रुतीच्या जन्मानंतर या दोघांनी लग्न केले होते आणि ब-याच काळानंतर त्यांना अक्षरा ही दुसरी मुलगी झाली. मात्र कमल हसन सारिकाशी एकनिष्ठ न राहिल्याने काही वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला.

श्रीदेवी - बॉलिवूडमधील ही पहिली अभिनेत्री आहे जीने आपण लग्नाआधीच गरोदर असल्याचे खुलेपणाने मान्य केले. आधीच विवाहीत असलेला निर्माता बोनी कपूरसोबत तिचे प्रेमप्रकरण सुरू होते. श्रीदेवी सात महिन्यांची गरोदर असताना १९९६ साली तिने बोनी कपूर सोबत लग्न केले आणि त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत त्यांची मोठी मुलगी जान्हवीचा जन्म झाला.

नीना गुप्ता - वेस्ट इंडिजचा क्रिकेटर व्हिवियन रिचर्डसोबत नीना गुप्ताचे प्रेमप्रकरण बराच काळ सुरू होते. रिचर्डपासून नीना गरोदर राहिली मात्र रिचर्ड यांनी आपल्या पहिल्या पत्नीसोबतच रहाणे पसंत केले. त्यामुळे नीनाने त्यांची मुलगी मसाबाचे संपूर्ण पालकत्व एकटीने पार पाडले.

महिलांनी लग्नाआधीच गरोदर राहणे ही गोष्ट पाश्चिमात्य देशात अतिशय सामान्य समजली जात असली तरी भारतासारख्या देशात याला अद्यापही सामाजिक मान्यता नाही. पण बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लग्नाआधी गरोदर होत्या..