Ileana D'Cruz: अभिनेत्री इलियाना डीक्रूज प्रेग्नेंट आहे. अखेर तिने तिच्या बॉयफ्रेंडचा एक फोटो शेअर केला. यामध्ये दोघेही एकमेकांचा हातावर हात ठेवून बसलेले दिसत आहेत. विशेष म्हणजे इलियाना डिक्रूजच्या हातात एंगेजमेंट रिंगही पाहायला मिळते. इलियाना लवकरच एका मुलाची आई होणार आहे.
कोण आहे इलियाना डिक्रूजचा बॉयफ्रेंड?इलियाना डिक्रूजने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो एका मिस्ट्री मॅनसोबत दिसतेय आहे. फोटोवरुन असा अंदाज लावण्यात येतोय की इलियाना बॉयफ्रेंडसोबत डिनर डेटवर गेली आहे आणि त्यादरम्यानचा हा फोटो.
फोटोमध्ये इलियाना डिक्रूजची हातात हिऱ्याची अंगठीही दिसत आहे. त्याने ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. फोटोत दोघांचे ही चेहरे दिसत नाहीत. दोघेही फोटो हातील अंगठ्या फ्लॉंट करताना दिसत आहेत. हा फोटो इलियाना डिक्रूझच्या बेबीमून दरम्यान काढण्यात आला आहे.
इलियानाने ८ एप्रिल २०२३मध्ये प्रेग्नंसी सोशल मीडिया पोस्ट करत जाहिर केली होती. यादरम्यान 'बर्फी' फेम अभिनेत्री सोशल मीडियावर दोन क्युट फोटो शेअर केले होते. पहिला फोटो टीशर्टचा आहे ज्यावर 'अँड सो द अँडव्हेंचर बिगिन्स' असं लिहिलेलं होतं. तर दुसरा फोटो तिच्या गळ्यातील पेंडंटचा आहे. 'mama' (ममा) अशा आशयाचं हे पेंडंट आहे. इलियानाची पोस्ट बघून सगळ्यांना धक्काच बसला आहे.