प्रेग्नेंसीत वाढलेल्या वजनामुळे ट्रोल झाली समीरा रेड्डी, भडकून ट्रोलर्सना दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 05:35 PM2019-03-13T17:35:16+5:302019-03-13T17:37:09+5:30

बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी दुसऱ्यांदा आई होणार आहे. समीरा दुसऱ्यांदा प्रेग्नंट असून या प्रेग्नंसी काळातले काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

pregnant-sameera-reddy-gave-a-tight-slap-on-the-face-of-trollers-with-her-reaction | प्रेग्नेंसीत वाढलेल्या वजनामुळे ट्रोल झाली समीरा रेड्डी, भडकून ट्रोलर्सना दिले उत्तर

प्रेग्नेंसीत वाढलेल्या वजनामुळे ट्रोल झाली समीरा रेड्डी, भडकून ट्रोलर्सना दिले उत्तर

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी दुसऱ्यांदा आई होणार आहे. समीरा दुसऱ्यांदा प्रेग्नंट असून या प्रेग्नंसी काळातले काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे वाढलेले वजन स्पष्टपणे दिसत आहे. वाढलेल्या वजनामुळे अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. ट्रोल झाल्यानंतर समीराने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.

समीरा म्हणाली, प्रेग्नेंसीच्या काळात स्त्रियांच्या शारीरिक, मानसिक स्थितीमध्ये अनेक बदल होत असतात. महिल्यांच्या शरीर रचनेत दिवसेंदिवस बदल होत असतो. प्रत्येकाची शरीररचना वेगवेगळी असते. त्यामुळे असे बदल होणे सहाजिकचं आहे. या दिवसांमध्ये काही जणी करीना कपूर सारख्या फिट दिसतात. म्हणून प्रत्येक महिला या काळात करीना कपूरसारखीच हॉट आणि सेक्सी दिसेलच असे नाही ना ? काही जणींचे वजन माझ्यासारखे वाढते. मी करीना कपूर नाही त्यामुळे माझे हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी मला बराच कालावधीही लागेल.


समीरा दुसऱ्यांदा आई होणार असून तिने तिच्या बेबीबंपसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. मात्र तिचे फोटो पाहून तिला ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले. समीरा जुलैमध्ये दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे.

दुसऱ्यांदा प्रेंग्नेंट असल्याचे खुद्द समीराने सांगितले व पुढे म्हणाली की, हो मी दुसऱ्यांदा प्रेंग्नेंट आहे. माझ्या प्रेग्नेंसीला चार महिने झाले आहेत. सध्या मी कोणत्याही प्रोजेक्टवर काम करत नाही. माझी डिलेवरी जुलैमध्ये होणार आहे.

Web Title: pregnant-sameera-reddy-gave-a-tight-slap-on-the-face-of-trollers-with-her-reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.