Join us

प्रेग्नेंट सुगंधा मिश्रानं केलं पतीसोबत रोमाँटिक फोटोशूट, अभिनेत्री फ्लॉन्ट केला बेबी बम्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 09:44 IST

आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी हे कपल खूपच उत्सुक आहे.

 गायिका आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा लवकरच आई होणार आहे. अलिकडेच ही गोड बातमी तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली.  सुगंधाने सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नन्सीदरम्यानचे काही फोटो शेअर केलेत. यात सुंगधासोबत तिचा पती आणि कॉमेडियन संकेत भोसलेसुद्धा दिसतोय.  कॉमेडियन या फोटोंमध्ये आपला बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसतेय. 

संकेत आणि सुगंधा यांनी ही आनंदाची बातमी नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच १५ ऑक्टोबर २०२३ सांगितली. दोघांनी एक अधिकृत पोस्ट करून आपल्या चाहत्यांना सांगितले की ते लवकरच आई-बाबा होणार आहेत. हे कपल आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेत आहेत. चाहते देखील  त्यांचं अभिनंदन करत प्रेमाचा वर्षाव करतायेत. 

सुगंधाने इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटो पोस्ट केलेत. ज्यात ती बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसतेय. तिच्यासोबत पती संकेत भोसलेसुद्धा दिसतोय. या कपलचे काही रोमाँटिक फोटो देखील यात आहे. दोघांनी समुद्र किनारी हे फोटोशूट केलं आहे.  

३५ वर्षीय सुगंधा मिश्रा हिने २०२१ मध्ये संकेतसोबत लग्न केले. दोघांच्या लग्नाला २ वर्षे झाली आहेत. सुगंधा मिश्राने गेल्या काही वर्षांत एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून तिची एक वेगळी जागा निर्माण केली आहे.  ती द कपिल शर्मा शो मध्ये देखील झळकली आहे. डॉ. संकेत भोसले हा प्रसिद्ध कॉमेडियन असून संजय दत्तची मिमिक्री तो खूप चांगल्याप्रकारे करतो. तो व्यवसायाने डॉक्टर आहे.

टॅग्स :सुगंधा मिश्रा