Join us  

Pushpa 2ची जोरदार तयारी सुरू, अल्लू अर्जुनसाठी 'पुष्पा नाम सुनकर' डायलॉग लिहिणाऱ्या लेखकाने केले बरेच खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 2:48 PM

Pushpa Movie: साउथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना(Rashmika Mandana)चा पुष्पा चित्रपट रिलीज होऊन बराच काळ उलटला तरीदेखील या चित्रपटाची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही.

साउथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना(Rashmika Mandana)चा पुष्पा (Pushpa Movie) चित्रपट रिलीज होऊन बराच काळ उलटला तरीदेखील या चित्रपटाची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे चाहते दुसऱ्या भागाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या चित्रपटातील ‘पुष्पा एंटे फ्लावर अनुकुंटिवा…फायर’ म्हणजेच पुष्पा नाम समझकर फ्लॉवर समझे क्या फायर है मैं है हा डायलॉग सुपरडुपर हिट झाला. यावर लाखो रील बनवल्या गेल्या आहेत. या तेलगू चित्रपटाचा नायक पुष्पाराजला हिंदीत आवाज श्रेयस तळपदे (Shreyas Talpade)ने दिला आहे. यासाठी श्रेयसचे खूप कौतुक झाले. हा डायलॉग लिहिला आहे श्रीकांत विसा यांनी. ब्लॉकबस्टर पुष्पा या चित्रपटासाठी संवाद लिहिणारे श्रीकांत विसा आता 'पुष्पा: द रुल' अधिक चांगला आणि अपेक्षेपेक्षा जास्त बनवण्यासाठी कोणतीही कसर ठेवणार नाही आहेत. त्यांनी चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या संवादांवर कामदेखील सुरू केले आहे. अलीकडेच पिंकव्हिलाशी बोलताना त्यांनी बऱ्याच गोष्टींचे खुलासे केले. ते 'पुष्पा: द रुल' चित्रपटातून एक दर्जा वाढवण्याचा विचार करत आहेत.

त्यांनी लिहिलेले डायलॉग्स इतके सुपरहिट होतील अशी अपेक्षा कधी केली होती का? असा प्रश्न विचारल्यानंतर श्रीकांत यांनी उत्तर दिले की, 'हे अनपेक्षित होते, म्हणजे चित्रपटातील हा डायलॉग एवढा मोठा पल्ला गाठेल किंवा एवढा व्यापक होईल असे कधीच वाटले नव्हते. चित्रपटातील बहुतेक संवादांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. पुष्पा 2 (पुष्पा: द रुल) सह आणि आम्ही असे आणखी उत्तम संवाद घेऊन येत आहोत.

पुष्पा 2 मध्ये असणार अनेक सिग्नेचर डायलॉग श्रीकांत विसासोबत सुकुमार म्हणाले, 'पुष्पा भाग २ मध्ये अल्लू अर्जुनसाठी असे सिग्नेचर डायलॉग्स आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. प्रयत्न नेहमीच असतो आणि अशा ओळी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे पुष्पा मध्ये काम केले आहे आणि त्याच्या भाग २ साठी आम्ही अपेक्षा करतो की तो मोठा आणि चांगला असेल. पुष्पा २ मध्ये तुम्हाला नक्कीच खूप आकर्षक लाइन ऐकायला मिळतील.

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनरश्मिका मंदानाश्रेयस तळपदे