Join us

प्रिन्स नरुला अन् युविका चौधरी झाले आईबाबा, वयाच्या ४१ व्या वर्षी अभिनेत्रीने दिला बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 16:39 IST

लग्नाच्या ६ वर्षांनंतर त्यांना आईबाबा होण्याचं सुख मिळालं.

टीव्हीवरील लोकप्रिय कपल प्रिन्स नरुला (Prince Narula) आणि युविका चौधरी (Yuvika Chaudhary) आईबाबा झाले आहेत. युविकाने लग्नानंतर सहा वर्षांनी पहिल्या बाळाला जन्म दिला. त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे. युविकाने गोंडस परीला जन्म दिला आहे. अद्याप दोघांकडूनही अधिकृत स्पष्टीकरणं आलेलं नाही. मात्र प्रिन्सच्या वडिलांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.

प्रिन्स नरुलाचे वडील जोगिंदर नुरुला यांनी ईटाईम्सशी संवाद साधला. ते म्हणाले,"युविकाने काल संध्याकाळी मुलीला जन्म दिला. आम्ही सगळेच खूप आनंदी आहोत. दोघांना आणि आमच्या नातीला खूप खूप आशीर्वाद."  युविका आयव्हीएफ ट्रीटमेंटच्या मदतीने गरोदर राहिली होती. आता वयाच्या ४१ व्या वर्षी तिने मुलीला जन्म दिला आहे. 

युविका आणि प्रिन्स २०१५ मध्ये बिग बॉस 9 मध्ये भेटले. तिथूनच त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. २०१६ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला तर २०१८ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर तिने दोन वर्षातच प्रेग्नंसीसाठी प्रयत्न केला. मात्र वय वाढलं की शरिरात अनेक बदल होतात ज्यामुळे प्रेग्नंसी फेल होते. याचकारणाने तिने नंतर आयव्हीएफचा मार्ग निवडला. या मार्गातही तिला प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलं होतं असा खुलासा तिने केला होता.

टॅग्स :प्रिन्स नरूलायुविका चौधरीप्रेग्नंसीटिव्ही कलाकार