Join us

मावशीकडून पैसे उधार घेऊन गाठली मुंबई, एका चित्रपटाने बदललं नशीब, रणबीर कपूरच्या पणजोबांची अशी झालेली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2023 1:55 PM

आपल्या अभिनयानच्या जोरावर त्याने इंडस्ट्रीवर वर्षानुवर्षे अधिराज्य गाजवलं.

हिंदी चित्रपटसृष्टीतील या स्टारने 1931 मध्ये आपल्या चित्रपटातून हे सिद्ध केले होते की तो इंडस्ट्रीत नवा बदल घडवून आणणार आहे. आपल्या अभिनयानच्या जोरावर त्याने इंडस्ट्रीवर वर्षानुवर्षे राज्य केले. कपूर घराण्याचा हा स्टार ज्याने आपल्या प्रत्येक भूमिकेत प्राण ओतले. चित्रपटांमध्ये काम करूनही रंगभूमीची ओढ असणारा 1944 मध्ये पृथ्वी थिएटरची स्थापना करणारी ही व्यक्ती आहे.

कपूर घराण्यातील बहुतेक जण इंडस्ट्रीत आले आहेत. त्यातील काहीजण यशस्वी झाले तर काही एकदोन सिनेमा करुन गायब झाले. 1931 मध्ये त्यांनी प्रसिद्ध अभिनेते पृथ्वीराज कपूर यांच्या 'आलम आरा' या त्यांच्या पहिल्या बोलक्या चित्रपटात सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले. देवकी बोस यांच्या 'सीता' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारल्यानंतर 1934 मध्ये खरी ओळख मिळाली. 

ते पृथ्वीराज कपूर होते ज्यांनी फिल्मी दुनियेत प्रवेश केला आणि ही परंपरा पिढ्यानपिढ्या  आजही सुरु आहे. त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील युगपुरुष असेही म्हटले जाते. त्यांना सुरुवातीपासूनच अभिनयात करिअर करायचे होते, असे म्हटले जाते. 1928 साली मावशीकडून काही पैसे उधार घेऊन त्यांनी मुंबई गाठली. करिअरची सुरुवात करणे त्यांच्यासाठी सोपे काम नव्हते. त्या काळात अभिनेत्याला खूप संघर्ष करावा लागला होता. अभिनेता असण्यासोबतच ते एक सुप्रसिद्ध थिएटर आर्टिस्ट देखील होते.

टॅग्स :पृथ्वीराज कपूर