प्रिया बापट काही दिवसांपूर्वी भोपाळमध्ये चित्रीकरण करीत होती. भोपाळमध्ये चित्रीकरण संपल्यावर तिने हिमाचलमध्ये काही वेळ घालवायचा ठरवला आणि ती तिथे फिरायला गेली. सध्या ती तिथे ट्रेकिंगदेखील करीत आहे. हिमाचलवरून तिने तिच्या चाहत्यांसोबत फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला आहे. प्रिया आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना म्हणते, ‘मी डिसेंबरपासून सतत कुठे ना कुठे फिरतच आहे. गेल्या काही महिन्यांत मी पाँडिचेरी, मेघालय, कोच्ची अशा विविध ठिकाणांना भेटी दिल्या आहेत आणि आता मी हिमाचलमध्ये आली आहे. हिमाचलमधील सौंदर्य, इथले वातावरण याच्या तर मी प्रेमात पडले आहे. प्रियाने तिथे जाऊन ट्रेकिंगदेखील केले आहे.’ तिच्या या ट्रेकिंगच्या अनुभवाविषयी ती सांगते, मी धर्मशालाजवळील धर्मकोट येथे पोहोचली. तिथून चालत मी ट्रेकिंग करत त्रियुंडचा डोंगर गाठला. मला हा डोंगर चढायला जवळजवळ अडीच तास लागला. हा डोंगर जवळजवळ साडेतीन हजार फूट उंचीवर आहे. इथला निसर्ग खूपच छान आहे. प्रियाने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्रियुंडचा निसर्गरम्य परिसर तिच्या चाहत्यांनादेखील दाखवला. तसेच ट्रेकिंगसाठी तिला मदत करणाऱ्या गाईडचीदेखील लोकांना ओळख करून दिली. एवढेच नाही तर डोंगर चढल्याने आता मला खूप भूक लागली असून मी जेवणावर ताव मारत असल्याचेही तिने तिच्या फॅन्सना सांगितले.
प्रिया हिमाचलमध्ये करतेय एन्जॉय
By admin | Published: May 07, 2017 12:09 AM