Join us

आजपर्यंत कधीही न केलेल काम करण्याचे धाडस दिले,कोरोनामुक्त झाल्यानंतर प्रिया बापटची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 11:12 AM

प्रिया बापट बरोबरच उमेश कामतलाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनी याविषयीची माहिती चाहत्यांना दिली होती.

मराठी मनोरंजन विश्वातील क्यूट जोडी अर्थात अभिनेता उमेश कामत  आणि अभिनेत्री प्रिया बापट या जोडीला नेहमीच चाहत्यांची पसंती मिळत असते.प्रिया बापट बरोबरच उमेश कामतलाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनी याविषयीची माहिती चाहत्यांना दिली होती. दोघांची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आल्यानंतर दोघं घरातच क्वारंटाईन झाले होते. त्यांच्यावर उपचारही सुरु होते. या दरम्यान ते त्यांच्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संपर्कात होते. त्यानंतर पुन्हा एकदा पोस्ट करत त्यांनी कोरोनामुक्त झाल्याची गुडन्यूज देखील दिली  होती.  त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रिया बापटचा सकारात्मकता ऊर्जा देणारी पोस्ट चर्चेत आली आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये सेलिब्रेटी कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. मात्र योग्य उपचार घेतल्यानंतर बरेही होत आहेत. कोरोना काळात अनेक सेलिब्रेटी जमेल तशी प्रत्येकाला मदत करत आहेत. इतकेच नाही तर प्रत्येकाने अशा या कठिण काळात मदत करण्याचे आवाहन करत आहेत. कोरोना काळात ख-या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडत आहे. 

नुकतेच अभिनेत्री प्रिया बापटनेही तिच्या आयुष्यात मोठ्या धाडसाने एक काम केले आहे. आजपर्यंत तिने रक्तदान केले नव्हते. सुईची भीती वाटते म्हणून कधीच रक्तदान करण्याची हिंमत होत नव्हती. मात्र पहिल्यांदाच मनात कोणतीही भीती न ठेवता  रक्तदान केल्याचा आनंद तिने चाहत्यांसह शेअर केला आहे. रक्तदान केल्यानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त करत एक वेगळेच समाधान मिळाल्याचे सांगितले आहे.

आज पहिल्यांदा रक्तदान केल्यानंतर किमान एक जीव वाचवण्यासाठी मी जे काही करू शकते ते केलं, आता आपल्याला शांत झोप लागणार असल्याचं तिने म्हटलं आहे. रक्तदान हे महादान आहे त्यामुळे प्रिया बापटची ही पोस्ट पाहून इतरांनाही प्रेरणा मिळणार हे मात्र नक्की. एकुणच काय तर कोरोनाने केवळ शिकवलेच नाही तर तसे वागायला भाग पाडले. खरंच कोरोनाने 'न भूतो न भविष्यति' अशी अनुभूती दिली आहे असे म्हणणेही चुकीचे ठरणार नाही. 

टॅग्स :प्रिया बापटमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस