Join us

किती गोड! प्रिया बापटने शेअर केला रोमँटिक फोटो, म्हणाली, "सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त केलेलं..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 10:11 AM

प्रिया बापट आणि उमेश कामतची जोडी कायमच हिट आहे.

मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वांचीच लाडकी जोडी कोणती असं विचारलं तर उमेश कामत-प्रिया बापटचं (Umesh Kamat-Priya Bapat) नाव समोर येईल. अनेक वर्ष डेटिंग आणि नंतर संसार अशा प्रकारे गेल्या १७ वर्षांपासून दोघंही एकमेकांची साथ निभावत आहेत. एक आदर्श जोडी म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जातं. नात्यातलं प्रेम व्यक्त करणं किती महत्वाचं असतं हे प्रिया बापटने नुकतंच तिच्या पोस्टमधून दाखवलं आहे. नवऱ्यावरचं प्रेम सगळ्यांसमोर व्यक्त करण्यात काय हरकत आहे असं म्हणत ती उमेशसोबत रोमँटिक झाली आहे. 

प्रिया बापट आणि उमेश कामतची जोडी कायमच हिट आहे. त्यांचं एकमेकांवरील प्रेम अनेकदा त्यांच्या पोस्टमधून व्यक्त होताना आपण पाहिलंय. नुकतंच प्रियाने उमेशसोबत दोन फोटो पोस्ट केलेत. यामध्ये ती उमेशसोबत भलतीच रोमँटिक झाली आहे. त्याला किस करत आहे. तर उमेशच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि हसू असे दोन्ही भाव आहेत. प्रियाने 'सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त केलेलं मला भयंकर आवडतं' असं कॅप्शन दिलं आहे. दोघांचा हा क्युट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

प्रियाचं प्रेम व्यक्त करण्याची ही पद्धत नेटकऱ्यांनाही आवडलेली दिसतेय. सगळ्यांनीच 'अगदी बरोबर' असं म्हणत तिला पाठिंबा दिलाय.'काय वाईट आहे त्यात' असं म्हणत मराठी कलाकार चैत्राली गुप्ते, सलील कुलकर्णी यांनी प्रियाला दाद दिली आहे. 

सध्या हे गोड कपल 'जर तर ची गोष्ट' नाटकातून रसिकांचं मनोरंजन करत आहेत. आजच्या काळातील नाती, रिलेशनशिप आणि त्याबद्दल तरुणांना पडणारे प्रश्न यावर नाटक आधारित आहे. पहिल्याच दिवसापासून नाटकाचे प्रयोग अगदी हाऊसफुल सुरु आहेत.

टॅग्स :प्रिया बापटउमेश कामतव्हायरल फोटोज्सोशल मीडिया