Join us

Priya Berde : प्रिया बेर्डेंच्या वर्गात होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, बालनाट्यात सोबत केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 8:36 AM

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचं शालेय शिक्षण दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात झालं.

मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली होती. त्यांना घरातूनच कलेचा वारसा लाभला आहे. त्यांची आई नाटकात काम करायची तर वडील कर्नाटकी सिनेमांचं दिग्दर्शन करायचे. त्यामुळे प्रिया यांनाही लहानपणापासून अभिनयाची गोडी निर्माण झाली. प्रिया बेर्डे यांनी एका मुलाखतीत लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तेव्हा त्यांनी एक बॉलिवूड अभिनेत्री शाळेत माझी क्लासमेट होती असा खुलासाही केला.

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचं शालेय शिक्षण दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात झालं. शाळेच्या आठवणींना उजाळा देताना त्या म्हणाल्या," मी शाळेत असल्यापासूनच स्नेहसंमेलन, नाटकांमध्ये भाग घ्यायचे. माझे आईवडील मनोरंजनसृष्टीतील आहेत हे माझ्या शिक्षकांनाही माहित होतं. त्यामुळे मी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावा असा शिक्षकांचा आग्रह असायचा. तर पहिली ते चौथी माझ्या बाकावर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर बसायची. आम्ही दोघींनी अनेक बालनाट्यांमध्ये एकत्र कामही केलंय."

मलाही अभिनयाची गोडी आहे हे समजल्यावर वडिलांनी मला त्यांच्या सिनेमात घेतलं होतं. तेव्हा मी अवघी १२ वर्षांची होते. यामध्ये निळू फुले, आशा काळे, वसंत शिंदे असे दिग्गज कलाकार होते. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्याकडून मी बरंच शिकले. सिनेमात आशा काळे यांच्या लहानपणीची भूमिका मी साकारली होती. याच सिनेमात मी पहिल्यांदा डान्सही केला.

टॅग्स :प्रिया बेर्डेउर्मिला मातोंडकरमराठी अभिनेताशाळा