Join us  

प्रियाने कलाकारांसह केली इफ्तार पार्टी!

By admin | Published: June 05, 2017 2:30 AM

छोटा पडदा, मोठा पडदा किंवा मग रंगभूमी... समाजात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांचं प्रतिबिंब या तिन्ही माध्यमांमध्ये पाहायला मिळतं

छोटा पडदा, मोठा पडदा किंवा मग रंगभूमी... समाजात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांचं प्रतिबिंब या तिन्ही माध्यमांमध्ये पाहायला मिळतं. यासोबतच विविध सणांचं सेलिब्रेशनही कोणत्या ना कोणत्या प्रसंगात तिन्ही माध्यमांत पाहायला मिळतंच. छोट्या पडद्यावर तर विविध भारतीय सणांचं सेलिब्रेशन मोठ्या दणक्यात केलं जातं. गणपती असो किंवा दिवाळी, ख्रिसमस असो किंवा ईद. प्रत्येक सण छोट्या पडद्यावरील मालिका आणि विविध शोमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. रमजानच्या या पवित्र महिन्यात सर्व मुस्लिम बांधव रोजा अर्थात उपवास पाळतात. रोजा सोडताना मुस्लिम बांधवांमध्ये इफ्तारीची प्रथा असते. इफ्तारीच्या माध्यमातून रोजे सोडले जातात. ठिकठिकाणी यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत असतं. याच पार्श्वभूमीवर छोट्या पडद्यावरील एका मालिकेच्या सेटवरही इफ्तारीचं आयोजन करण्यात आलं होतं. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करणारे कलाकार, पडद्यामागचे कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ यापासून ते स्पॉट बॉईज यांच्यातले अनेकजण रमजानच्या पवित्र महिन्यात रोजे पाळत असतील. त्या सगळ्यांसाठी या मालिकेच्या सेटवरसुद्धा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. या मालिकेत काम करणारी अभिनेत्री प्रिया मराठे हिनं सोशल मीडियावर या इफ्तार पार्टीची माहिती शेअर केली आहे. संपूर्ण युनिटसह इफ्तारचा आनंद घेतल्याचं टिवट तिनं केलं आहे. शिवाय, तिनं सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. या मालिकेच्या सेटवरील या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन घडलं आहे.