Join us

अचानक Instagramवरुन गायब झाली होती प्रिया प्रकाश वारियर, आता Video शेअर करत सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 18:47 IST

इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास ७ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स होते.

अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर इन्स्टाग्राम खूप अॅक्टिव्ह आहे. फॅन्ससोबत लेटेस्ट फोटोशूट शेअर करत असते. गेल्या काही दिवसांपासून प्रिया सोशल मीडियावरुन गायब आहे. प्रिया प्रकाशने इन्स्टाग्राम अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्हेट केल्याचे समजते. लॉकडाऊनमध्ये प्रिया प्रकाशचे सोशल मीडियापासून दूर जाण्याच्या अनेक कारणांची चर्चा होऊ लागली. प्रियाने व्हिडीओ शेअर करत इन्स्टाग्रामवरुन लांब जाण्याचे कारण फॅन्सना सांगितले आहे. प्रिया नॅशनल क्रश असून तिचे सोशल मीडियावर अफाट चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास ७ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स होते.

प्रिया प्रकाशने व्हिडीओ शेअर करत सांगितले की, जरी लॉकडाऊनमध्ये लोक सोशल मीडियावर जास्त सक्रिय झाली आहेत. मला मात्र स्वत:ला थोडासा वेळ द्यायचा आहे. याच कारणामुळे तिने इन्स्टाग्राम अकाऊंट  डिअ‍ॅक्टिव्हेट  केले होते. ऐवढेच नाही तर प्रियाने हेही सांगितले की गेल्या दोन आठवड्यात तिला खूप शांतता मिळाली त्यामुळे पुढेपण ती सोशल मीडियापासून दूरच राहणे पसंत करणार आहे. 

‘ओरू आडार लव्ह’ या मल्याळम चित्रपटातून करिअरची सुरूवात करणारी प्रिया सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. ‘ओरू आडार लव्ह’ या चित्रपटातील तिचा को-स्टार रोशन अब्दुल रऊफसोबत तिच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत आहेत.

टॅग्स :प्रिया वारियर