Join us

प्रिया प्रकाश वारियरचा नवा व्हिडीओ पाहिलात?, ही आहे व्हिडीओची खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 15:44 IST

या व्हिडीओत प्रिया अप्रतिम डान्स करताना दिसतेय.

आपल्या नजरेच्या कातील इशाऱ्याने एका रात्रीत प्रकाशझोतात येणारी प्रिया प्रकाश वारियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  प्रियाने तिचा नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रिया अप्रतिम डान्स करताना दिसतेय. या व्हिडीओला तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. 

सध्या प्रिया प्रकाशचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. प्रिया प्रकाश यात ऐश्वर्या रायचे सिनेमात 'ताल' मधील ‘ताल से ताल मिला’ या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. प्रियाच्या या व्हिडीओ चाहत्यांची चांगलीच पसंती मिळतेय. विशेष म्हणजे  या व्हिडीओत प्रियाने बसून डान्स केला आहे. 

प्रियाने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे, "काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतेय. मला कल्पना आहे की मी या कोरिओग्राफीसोबत अजिबात न्याय नाही केला, म्हणून चुकांकडे दुर्लक्ष करा. मी प्रयत्न करतेय  आशा आहे की तुम्हाला हे आवडेल. आतापर्यंत या व्हिडीओला चार लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत. 

‘ओरू आडार लव्ह’ या मल्याळम चित्रपटातून करिअरची सुरूवात करणारी प्रिया सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. ‘ओरू आडार लव्ह’ या चित्रपटातील तिचा को-स्टार रोशन अब्दुल रऊफसोबत तिच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत आहेत.

टॅग्स :प्रिया वारियर