Join us

Photo: 'नॅशनल क्रश' प्रिया वॉरिअरचा बदलला लूक; फोटो पाहून तुम्ही ओळखू शकाल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 11:57 IST

Priya prakash varrier: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्रियाने अलिकडेच तिच्या दुबई ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत.

प्रिया प्रकाश वॉरिअर (priya prakash varrier)  हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. एक डोळा मारुन ही अभिनेत्री रातोरात सुपरस्टार झाली होती. विशेष म्हणजे प्रिया आज सोशल मीडिया सेंसेशन म्हणून ओळखली जाते. त्यामुळे तिच्याविषयीचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यातच अलिकडे प्रियाने इन्स्टावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. इतकंच नाही तर तिचा लूक प्रचंड चेंज झाल्याचं पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्रियाने अलिकडेच तिच्या दुबई ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती प्रचंड ग्लॅमरस दिसून येत आहे. इतकंच नाही तर तिच्या कमालीचा बदल झाला आहे.  सध्या तिच्या या फोटोंना विशेष पसंती मिळत असून ते व्हायरल होत आहेत. 

प्रियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती दुबईमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच तिने वेस्टर्न आऊटफिट परिधान केला आहे. सोबतच केस मोकळे सोडल्यामुळे ती आणखीच सुंदर दिसत आहे.

दरम्यान, प्रिया प्रकाश वॉरिअर २०१९ मध्ये चर्चेत आली होती. 'ओरु अदार लव'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तिची लोकप्रियता झपाट्याने वाढली. या व्हिडीओमध्ये तिने केवळ डोळा मारला होता. मात्र, तिची ही स्टाइल नेटकऱ्यांना प्रचंड भावली होती.

टॅग्स :प्रिया वारियरTollywoodबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा