Join us

Stunning! वेड लावतील ‘एक्सप्रेशन क्वीन’ प्रिया प्रकाश वारियरच्या अदा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 15:48 IST

‘एक्सप्रेशन क्वीन’ म्हणून नावारुपास आलेल्या प्रियाच्या नव्या फोटोंनी सध्या चाहत्यांना वेड लावले आहे.

ठळक मुद्दे‘ओरू आडार लव्ह’ या मल्याळम चित्रपटातून करिअरची सुरूवात करणारी   प्रिया सध्या  तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे.

आपल्या नयनबाणांनी अनेकांना घायाळ करणारी प्रिया प्रकाश वॉरियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘एक्सप्रेशन क्वीन’ म्हणून नावारुपास आलेल्या प्रियाच्या नव्या फोटोंनी सध्या चाहत्यांना वेड लावले आहे.  डोळा मारतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर प्रिया रातोरात स्टार झाली होती. तिच्या अदांवर अख्खे जग भाळले होते. आता तिच्या ताज्या फोटोंनीही चाहत्यांना घायाळ केले आहे.

प्रिया काय सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकतेच तिने एका वेगळ्या लूक मधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत प्रिया कमालीची सुंदर दिसतेय. तिचे लूकही नेहमीपेक्षा हटके आहे.

‘ओरू आडार लव्ह’ या मल्याळम चित्रपटातून करिअरची सुरूवात करणारी   प्रिया सध्या  तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. ‘ओरू आडार लव्ह’ या चित्रपटातील तिचा को-स्टार रोशन अब्दुल रऊफसोबत तिच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत आहेत. अर्थात आमच्यात असे काहीही नसल्याचे प्रियाचे म्हणणे आहे. आता प्रियाच्या पर्सनल लाईफमध्ये नेमके काय सुुरु आहे, हे यशावकाश कळेलच. तोपर्यंत पाहा, तिच्या या मनमोहक अदा...

टॅग्स :प्रिया वारियर