बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये गेलेल्या प्रियंका चोप्रा भलेही न्यूयॉर्कमध्ये राहते मात्र आजही तिची नाळ भारताशी जोडलेली आहे. याच कारणमुळे न्यूयॉर्कमध्ये राहून सुद्धा भारतात जेव्हा कोरोना व्हायरससारखे संकट आले तेव्हा तिने मदतीचा हात पुढे केला आहे. प्रियंका चोप्रा आणि निक जोनासने पीएम केअर फंडसाठी डोनेशन दिले आहे.
इन्स्टाग्रामवरुन प्रियंकाने ही माहिती दिली आहे. प्रियंका लिहिते, ''जगभरात असे अनेक लोक आहेत ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे. हे माझ्या आणि निकसाठी गरजेचे होते की आम्ही अशा संस्थानांना मदत केली पाहिजे जे गरीब, बेघर कुटुंबीयासांठी काम करतायेत. त्यांना तुमच्या मदतीचीदेखील गरज आहे. कोणतीही रक्कम लहान नसते भलेही ती एक डॉलरची असली तरी. एकत्र मिळून आपण ही परिस्थिती बदलू शकतो.''
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान मांडले आहे. त्यात देशातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालल आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली. यासोबतच त्यांनी पीएम केअर फंडमध्ये डोनेशन देण्यासाठी लोकांना विनंती केली आहे. आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक कलाकरांनी मदतीचा हात पुढे करत पीएम केअर फंडला मदत केली आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी मदत करण्यासाठी पुढे आले असून वरुण धवन, भुषण कुमार, राजकुमार राव, कपिल शर्मा यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीत काही लाखांची मदत केली आहे. अभिनेता अक्षय कुमारने तर 25 कोटींची मदत केली आहे.