Join us  

भर कार्यक्रमात Nick Jonasसोबत रोमाँटिक झाली Priyanka Chopra, 'तो' व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 11:22 AM

निक जोनास आणि प्रियंका चोप्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा अनेकदा चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. नुकताच ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता. प्रियंका चोप्रा या फेस्टिव्हलची होस्ट होती, तर जोनास ब्रदर्सने यात परफॉर्म केले. मात्र, संपूर्ण फेस्टिव्हलमध्ये चर्चा राहिली ती प्रियंका आणि निकच्या केमिस्ट्रीची.

न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते, जो देसी गर्ल प्रियंका चोप्रानं होस्ट केला. शो दरम्यानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्यापैकी एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओमध्ये निक जोनास आणि प्रियंका चोप्रा एकमेकांना किस करताना दिसत आहेत. दोघांच्या केमिस्ट्रीने लोकांची मनं जिंकली आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये जोनास ब्रदर्सच्या फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म केल्यानंतर निक जोनासने प्रियंका चोप्राला स्टेजवर बोलावलं. यानंतर जेव्हा प्रियंका स्टेजवर येताच दोघांनी किस केले. प्रियंकाने जोनास ब्रदर्सला मिठी मारली. 

 अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सिटाडेल या चित्रपटात दिसणार आहे. हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर प्रियांका 'जी ले जरा' या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट आणि कतरिना कैफसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास