Join us

लास वेगसमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने गुपचूप उरकले लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 4:50 PM

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची लव्हस्टोरी आता सगळ्यांच माहिती आहे. दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. आधी दोघे जोधपूरला डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी प्रियांका लास वेगसमध्ये होती तेव्हाच हा फोटो आहे

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची लव्हस्टोरी आता सगळ्यांच माहिती आहे. दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. आधी दोघे जोधपूरला डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची चर्चा आहे. अशातच आयरिश अभिनेत्री  एमेट ह्यूने या कपलसोबतचा फोटो शेअर केला आहे.  या फोटोवरुन असा अंदाज लावण्यात येतो आहे की प्रियांका आणि निकने गुपचूप लग्न केले आहे. 

काही दिवसांपूर्वी प्रियांका लास वेगसमध्ये होती तेव्हाच हा फोटो आहे. एका छोट्या चर्चा बाहेर हा फोटो काढण्यात आला आहे. प्रियांका -निकचा 18 ऑगस्टला रोका झाला होता. विधिवत पार पडलेल्या या छोटेखानी सोहळ्याला दोघांच्याही कुटुंबातले काही मोजकेच लोक उपस्थित होते. डिसेंबरमध्ये हे कपल लग्नाच्या बंधनात अडकणार होते. मात्र आता , प्रियांका व निकने यावर्षी नाही तर पुढील वर्षी जानेवारीत लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळतेय. चर्चा खरी मानाल तर दोघेही १४ वा १५ जानेवारीला लग्नबंधनात अडकू शकतात. दोघांच्याही कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे कळतेय. प्रियांका व निक दोघेही सध्या आपआपल्या करिअरमध्ये एका वेगळ्या उंचीवर पोहोचले आहेत. अनेक प्रयत्नांनी दोघांनीही आपले करिअर घडवले आहे. असे असताना हे करिअर सोडणे वा त्यातून बे्रक घेणे दोघांसाठीही सोपे नाही. त्यामुळे तूर्तास तरी कामापुढे काहीच नाही, असे दोघांचेही धोरण आहे. याचमुळे दोघांनीही लग्नाची तारीख लांबणीवर टाकल्याचे कळतेय.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास