Join us  

प्रियंकाच्या लाडक्या लेकीच्या क्युटनेसवर फिदा झाले नेटकरी, मालती मेरीचा फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 12:35 PM

नेटकरी मालती मेरीच्या क्युटनेसवर फिदा झालेत.

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. प्रियंका चोप्रा अनेकदा इन्स्टाग्रामवर स्वतःचे आणि तिच्या कुटुंबाचे फोटो शेअर करत असते, जे तिच्या चाहत्यांनाही खूप आवडतात. कधी प्रियंका चोप्रा निक जोनाससोबतचे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ शेअर करते, तर कधी तिची लेक मालती मेरीचे क्यूट फोटो व्हायरल होतात. आता पुन्हा एकदा मालती मेरीचा एक क्युट फोटो व्हायरल होतोय. नेटकरी मालती मेरीच्या क्युटनेसवर फिदा झालेत.  

अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या चित्रपट जगतापासून थोडी दूर असली तरी सोशल मीडियावर ती चर्चेत असते.  प्रियंकाने शेअर केलेला एखादा फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर लगेच चर्चेत येतो. याच दरम्यान, प्रियंका चोप्राची लाडकी लेक मालती मेरी हिचा एक फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये मालती मेरी बोटीमध्ये दिसत आहे. या फोटोत मालती मेरीने डोक्यावर टोपी आणि काळा चष्मा घातलेला दिसत आहे. मालतीचा हा क्युट फोटो नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतोय. 

निक आणि प्रियांकाने 1 डिसेंबर 2018 रोजी जोधपूरच्या उम्मेद भवनमध्ये रितीरिवाजांनी विवाह केला. मालतीचा जन्म जानेवारी २०२२ मध्ये सरोगसीद्वारे झाला होता. तिची पहिली झलक या वर्षी जानेवारीमध्ये लॉस एंजेलिसमध्ये जोनास ब्रदर्स हॉलीवूड वॉक ऑफ फेममध्ये दिसली. अलिकडेच प्रियांकाची सिटाडेल ही हॉलिवूड वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यानंतर आता लवकरच ती  ‘हेड्स ऑफ स्टेट’ या हॉलिवूड सिनेमात झळकणार आहे. याशिवाय ती 'केजीएफ' (KGF) सारखा सुपरहिट सिनेमा देणारे दिग्दर्शक प्रशांत नील (Prashant Neel) यांच्यासोबत ज्युनिअर एनटीआरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप मेकर्सकडून अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही. 

टॅग्स :प्रियंका चोप्रा