Join us  

प्रियंका चोप्राच्या या जम्प सूटची किंमत वाचून बसेल धक्का, इतक्या पैशांत करू शकाल परदेशवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 4:20 PM

प्रियंकाने या कार्यक्रमात एक जम्प सूट घातला होता. या जम्प सूटची किंमत वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. या ड्रेसचा डिझायनर फ्रेंचमधील प्रसिद्ध डिझायनर रॉनल्ड मॉर्रेट आहे.

ठळक मुद्देप्रियंकाने या कार्यक्रमात एक जम्प सूट घातला होता. या कार्यक्रमात तिने घातलेल्या कपड्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तिने यावेळी घातलेला ड्रेस लाखोंच्या घरात आहे. 

प्रियंका चोप्रा तिच्या अभिनयाइतकीच तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. तिने नुकतीच ओप्रा विंर्फेच्या टॉेक शोमध्ये झळकली होती. त्यावेळी तिने तिचे चित्रपट, खाजगी आयुष्य याविषयी खूप साऱ्या गप्पा मारल्या. या कार्यक्रमात तिने घातलेल्या कपड्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तिने यावेळी घातलेला ड्रेस लाखोंच्या घरात आहे. 

प्रियंकाने या कार्यक्रमात एक जम्प सूट घातला होता. या जम्प सूटची किंमत वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. या ड्रेसचा डिझायनर फ्रेंचमधील प्रसिद्ध डिझायनर रॉनल्ड मॉर्रेट असून याची किंमत तब्बल दीड लाख रुपये आहे.  

प्रियंका काही दिवसांपूर्वी ऑस्करच्या नॉमिनेशनमुळे चर्चेत आली होती. जगातील सर्वात लोकप्रिय ऑस्कर अवॉर्ड 2021चं नॉमिनेशन काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलं. यात २३ वेगवेगळ्या विभागात नामांकन जाहीर झालं. 93 व्या ऑस्कर अवॉर्डचे नॉमिनेशन देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनसनं केलं होतं. जगातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे ऑस्कर पुरस्कार सोहळा यावर्षी उशिरा होत आहे. हा सोहळा फेब्रुवारीत पार पडतो. मात्र यावेळी हा पुरस्कार सोहळा २६ एप्रिलला होणार आहे. प्रियंका चोप्रा आणि राजकुमार राव यांच्या द व्हाइट टायगरला सर्वोत्कृष्ट लेखनसाठी नॉमिशनेशन मिळालं आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रा