Join us

Met Gala 2019मध्ये निक जोनास आणि प्रियंका चोप्राने अशी घेतली एन्ट्री!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 10:49 AM

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा याहीवर्षी ‘मेट गाला 2019’मध्ये दिसली. पण यावेळी तिचा अंदाज पाहून अनेक जण चकीत झालेत. प्रियंका  पती निक जोनाससोबत ‘मेट गाला 2019’च्या पिंक कार्पेटवर उतरली.

ठळक मुद्दे‘मेट गाला’ याच इव्हेंटमध्ये प्रियंका व निक जोनास यांची पहिली भेट झाली होती.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा याहीवर्षी ‘मेट गाला 2019’मध्ये दिसली. पण यावेळी तिचा अंदाज पाहून अनेक जण चकीत झालेत. प्रियंका  पती निक जोनाससोबतमेट गाला 2019’च्या पिंक कार्पेटवर उतरली. ब्रांडच्या सॉफ्ट पेस्टल गाऊनमध्ये प्रियंकाने पिंक कार्पेटवर एन्ट्री घेतली. या थाई हाय स्लिट गाऊनवर पिंक आणि येलो फेदर लागलेले होते.  या गाऊनमध्ये प्रियंका कमालीची सुंदर दिसत होती. पण  या गाऊनसोबत प्रियंकाने कॅरी केलेल्या हेअरस्टाईल आणि मेकअपने मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. प्रियंकाच्या हेअरस्टाईलिस्टने तिला ‘अफ्रिकन कर्ल’ स्टाईलची हेअरस्टाईल दिली. यावर एक क्राऊनही चढवला. ‘मेट गाला’च्या यंदाच्या थीमनुसार प्रियंकाचा हा लूक एकदम परफेक्ट होता. पण देसी गर्लवर हा लूक अनेकांना रूचला नाही. 

तिची हेअर स्टाईल, त्यावरचा क्राऊन हे सगळेच चर्चेचा विषय ठरले.  पिंक आणि शिमरी रंगाचा मेकअप आणि पांढºया रंगाच्या आईब्रो पाहून प्रियंकाचा हा लूक क्षणात व्हायरल झाला नसेल तर नवल. काहींना प्रियंकाचा हा लूक आवडला पण अनेक जण प्रियंकाचा हा अवतार पाहून थक्क झालेत. मग काय अनेकांनी प्रियंकाचा लूक पाहून खिल्ली उडवणे सुरु केले.

प्रियंकाचा पती निक जोनास यावेळी  व्हाईट सूटमध्ये दिसला. ‘मेट गाला’ याच इव्हेंटमध्ये प्रियंका व निक जोनास यांची पहिली भेट झाली होती.  2017मध्ये  ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर प्रियांका व निक सोबत दिसले होते. निकची ‘डेट’बनून प्रियांका या रेड कार्पेटवर उतरली होती. प्रियांका व निकची ओळख अमेरिकन टीव्ही सीरिज  क्वांटिकोच्या सेटवर झाली होती. 

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनासमेट गाला