Join us  

जोनास ब्रदर्सला प्रियंका चोप्राची साथ! म्युझिक व्हिडिओ अल्बमच्या दुनियेत धमाकेदार डेब्यू !!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2019 6:00 AM

मिसेस जोनास अर्थात प्रियंका चोप्राने हॉलिवूड म्युझिक व्हिडिओ अल्बमच्या दुनियेत धमाकेदार डेब्यू केलाय. होय, पती निक जोनास याचा नवाकोरा म्युझिक व्हिडिओ ‘सकर’मध्ये प्रियंकाचा अंदाज पाहण्यासारखा आहे.

ठळक मुद्देलग्नानंतर प्रियंका हॉलिवूड-बॉलिवूड दोन्हींमध्ये संतुलन राखण्याच्या प्रयत्नात दिसतेय. लवकरच प्रियंकाचा ‘इजन्ट इट रोमॅन्टिक ’ हा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होतोय.

मिसेस जोनास अर्थात प्रियंका चोप्राने हॉलिवूड म्युझिक व्हिडिओ अल्बमच्या दुनियेत धमाकेदार डेब्यू केलाय. होय, पती निक जोनास याचा नवाकोरा म्युझिक व्हिडिओ ‘सकर’मध्ये प्रियंकाचा अंदाज पाहण्यासारखा आहे. या व्हिडिओत केवळ निक जोनास व प्रियंकाचं नाहीत तर निकचे भाऊ, त्यांच्या बायकाही आहेत. आहे ना धम्माल.‘सकर’ हा जोनास बंधूंचा कमबॅक व्हिडिओ अल्बम आहे. जोनास ब्रदर्सनी या म्युझिक व्हिडिओद्वारे तब्बल सहा वर्षांनंतर वापसी केली आहे. जोनास ब्रदर्सच्या बेटरहाफही या व्हिडिओत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रियंकाने या म्युझिक व्हिडिओ अल्बमचे पोस्टर शेअर केले होते. आता हा म्युझिक व्हिडिओ रिलीज झालाय. यात प्रियंका पती निक जोनास आणि आपल्या दीरांसोबत नाचताना-गाताना दिसतेय.

व्हिडिओच्या लिरिक्सपासून त्याच्या म्युझिकपर्यंत सगळे काही मस्त जमून आलेय. निक जोनास व त्याच्या भावांनी सहा वर्षांपूर्वी आपली पार्टनरशिप संपवत वेगवेगळ्या वाटा निवडल्या होत्या. पण निकच्या लग्नानंतर जोनास ब्रदर्स पुन्हा एकत्र आले आहेत.

लग्नानंतर प्रियंका हॉलिवूड-बॉलिवूड दोन्हींमध्ये संतुलन राखण्याच्या प्रयत्नात दिसतेय. लवकरच प्रियंकाचा ‘इजन्ट इट रोमॅन्टिक ’ हा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होतोय. याशिवाय ‘स्काय इज पिंक’ हा तिचा बॉलिवूडपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. ‘इजन्ट इट रोमॅन्टिक ’या चित्रपटात प्रियंका चोप्रा एका योगा अ‍ॅम्बिसीडरच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात रिबेल विल्सन, लायन हेम्सवर्थ आणि एडम डिवाईनही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. प्रियंकाची ‘क्वांटिको’ हीअमेरिकन सीरिज प्रचंड गाजली होती. या शोने प्रियंकाला हॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख दिली.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास