Join us  

बॉयफ्रेन्ड निक जोनाससोबत सायकल राईडवर निघाली प्रियांका चोप्रा, पाहा फोटो!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 10:04 AM

प्रियांका चोप्रा सध्या बॉयफ्रेन्ड निक जोनाससोबत वेळ घालवते आहे. निकचे मित्र आणि काही जवळच्या लोकांसोबत अमेरिकेच्या रस्त्यावर प्रियांका सायकल राईडचा आनंद घेताना दिसली.

प्रियांका चोप्रा सध्या बॉयफ्रेन्ड निक जोनाससोबत वेळ घालवते आहे. निकचे मित्र आणि काही जवळच्या लोकांसोबत अमेरिकेच्या रस्त्यावर प्रियांका सायकल राईडचा आनंद घेताना दिसली.यावेळी प्रियांका ब्ल्यू डेनिम शॉर्ट्स आणि व्हाईट टॉपमध्ये होती. तर प्रियांका ब्लॅक शॉर्ट्स आणि व्हाईट टी-शर्टमध्ये होता.

 या रोमॅन्टिक राईडदरम्यान कधी प्रियांका व निक एकमेकांच्या हात हात घालून दिसले तर कधी प्रियांका निकच्या खांद्यावर हात ठेवून चालताना दिसली.

 निकने आपल्या काही जवळच्या मित्रांशी प्रियांकाची भेट घालून दिली. दोघांनीही सायकलवर सैर करत, एकमेकांसोबत निवांत वेळ घालवला.

लवकरच प्रियांका ‘भारत’ या चित्रपटाचे शूटींग सुरू करणार आहे. यासाठी ती येत्या काही दिवसांत भारतात परतेल. त्यापूर्वी बॉयफ्रेन्ड निकला पूरेपुर वेळ देण्याचे कदाचित प्रियांकाचे प्रयत्न आहे. 

काही दिवसांपूर्वी प्रियांकाच्या आई व कुटुंबाला भेटण्यासाठी निक भारतात आला होता. भारतातील मुक्काम संपवून निक व प्रियांका अमेरिकेत रवाना झाले आणि येथून पुढे ब्राझिलला पोहोचले. ब्राझिलमध्ये निकचे लाईव्ह कॉन्सर्ट होते. येथे प्रियांकाही त्याच्यासोबत होती.

टॅग्स :प्रियंका चोप्रा