सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्याकडे साऱ्या जगाचे लक्ष असते. आपला लाडका अभिनेता किंवा अभिनेत्री लग्नात काय परिधान करतात याकडं रसिकांच्या नजरा असतात. आतापर्यंत फक्त त्यांच्या पेहरावाच लग्नात असलेला आलिशान सजावट हेच सा-यांचे आकर्षण असायचे मात्र आता त्यांच्या लग्नात त्यांची एंट्री कसा असणार यावरही चर्चा रंगत आहेत. नुकतेच रणवीरनेही लग्नात सी- प्लेनने एंट्री करत सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. आता प्रियंका चोप्राही असाच हटके प्लॅन करण्याच्या तयारीत आहे. प्रियांका- नीक वेडिंग वेन्यूपर्यंत चॉपरने पोहोचणार आहेत. लग्नात सहभागी होणारे पाहुणेही जोधपुर एयरपोर्टवरुन चॉपरमध्ये स्वार होऊन थेट वेडिंग वेन्यूपर्यंत पोहोचणार आहेत. चॉपरने एंट्रीचा कमीत कमी खर्च दिड लाख रुपये असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे खास या रॉयल वेडींगसाठी पॅलेसमध्ये एक हॅलीपॅडही तयार केला जात आहे.
२९ नोव्हेंरपासून या दोघांच्या लग्नाच्या विधींना सुरूवात होईल. २ डिसेंबरला प्रियंका आणि निकचं शुभमंगल जोधपूरच्या उमेद भवन येथे पार पडणार असल्याच्या चर्चा आहेत. या लग्नासंदर्भातील छोट्या छोट्या बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार २९ नोव्हेंबरला मेहंदी आणि संगीत सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ३० नोव्हेंबरला कॉकटेल पार्टी, १ डिसेंबरला हळद समारंभ आणि २ डिसेंबरला प्रियंका-निकचं शुभमंगल पार पडणार असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. याशिवाय या लग्नात आमंत्रित करण्यात आलेल्या पाहुण्यांची यादीसुद्धा समोर आली आहे.
यांत सलमान खान,रणवीर कपूर,आलिया भट, कॅटरिना कैफ, फरहान अख्तर, सिद्धार्थ रॉय कपूर अशा सेलिब्रिटींचा समावेश आहे. या दोघांनी अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींना आपल्या लग्नाचं निमंत्रण पाठवल्याचं अनेक वृत्तांमधून समोर आले आहे. सध्या कपलच्या संगीत सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. निक जोनास संगीत सोहळ्यात आंतरराष्ट्रीय आणि बॉलीवुडच्या गाण्यावर थिरकणार आहे. 'गल्ला गुडिया' आणि 'पिंगा' या गाण्यावर तो थिरकणार आहे. प्रियंका आणि निक एकत्र खास परफॉर्मन्स देणार आहेत.