Priyanka Chopra : ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या ती मेट गाला इव्हेंट २०२३मधील तिच्या लूकमुळे लाईमलाईटमध्ये आहे. या मेट गालामधील तिचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहे. यादरम्यान एका मुलाखतीत देसीगर्लने एका धक्कादायक खुलासा केला. अभिनेत्रीने सांगितले की, नाकाची सर्जरी चुकीची झाल्याने तिला याचा त्रास झाला होता.
अभिनेत्री प्रियंका चोप्रा नुकतीच 'सिरियस एक्सएम द हॉवर्ड स्टर्न' शोमध्ये दिसली होती. यावेळी तिने आयुष्यातील चढ-उतारांवर मोकळेपणाने भाष्य केलं. यावेळी तिने त्याच्या फसलेल्या नाकाच्या सर्जरीबद्दलही सांगितलं. द हिरोः ऑफ ए स्पाय या चित्रपटाच्याआधी प्रियंकाने एक चित्रपट स्वीकारला होता. पण तिने या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्याआधी नाकावर सर्जरी केलेली असल्याने तिला हा चित्रपट गमवावा लागला होता
प्रियंका म्हणाली, "माझा चेहरा पूर्णपणे वेगळा दिसू लागला आणि मी डिप्रेशनमध्ये गेले," प्रियंका म्हणाली, "तिला वाटले की तिची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच संपली आहे." प्रियांकाने पुढे सांगितले की तिच्या वडिलांनीच तिला करेक्टिव सर्जरी करण्यासाठी प्रोत्साहित केले. मला त्याची भीती वाटत होती पण ते म्हणाले मी माझ्यासोबत रूममध्ये असेन,"
वडिलांचं कौतूक करताना प्रियंका म्हणाली, "त्यांनी माझा हात धरला आणि माझा आत्मविश्वास परत मिळवण्यास मदत केली." तीन वेगवेगळ्या चित्रपट गमावल्यानंतर तिला दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी भूमिका ऑफर केली.
प्रियंका चोप्रा लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली आणि सध्या ती हॉलिवूडमध्ये काम करते आहे. अचानक तिने तिथे स्थायिक होण्याचा आणि हॉलिवूडमध्ये काम करण्याचा घेतलेला निर्णय तिच्या चाहत्यांसाठी धक्कादायक होता. पण यामागचे कारण मध्यंतरी तिने स्पष्ट केले होते. बॉलिवूडमधील राजकारण, कंपूशाही अशा वेगवेगळ्या गोष्टींना कंटाळून तिने हॉलिवूडमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते.