Join us  

किती गोड! 'नजर काढ तिची', प्रियांकाच्या लेकीची पहिली झलक; चिमुकल्या 'मालती मेरी' वर चाहते फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 9:06 AM

नुकत्याच एका कार्यक्रमात प्रियांकाच्या क्युट मुलीचा चेहरा दिसला आणि नेटकरी अक्षरश: फिदा झाले.

Priyanka Chopra Daughter : बॉलिवुडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या motherhood चा आनंद घेत आहे. तिची लेक मालती मेरी (Malti Mary) एक वर्षाची झाली आहे. अनेकदा प्रियांकाने  लेकीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. मात्र नेहमीच मुलीचा चेहरा लपवला आहे. पण नुकत्याच एका कार्यक्रमात प्रियांकाच्या क्युट मुलीचा चेहरा दिसला आणि नेटकरी अक्षरश: फिदा झाले.

प्रियांकाचा पती निक जोनास (Nick Jonas) गायक आहे. जोनास ब्रदर्स (Jonas Brothers) नावाने हे जोनास भावंडं लोकप्रिय आहेत. जोनास ब्रदर्सचा नुकताच हॉलिवुडच्या वॉक ऑफ फेम मध्ये समावेश झाला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्व तिघे जोनास भाऊ त्यांच्या कुटुंबासोबत उपस्थित होते. तेव्हा प्रियांका चोप्राच्या कडेवर असलेल्या मालती मेरीचा चेहरा सर्वांना दिसला. निक जोनास स्टेजवरुन पत्नी प्रियांका आणि लेक मालती साठी आपल्या भावना व्यक्त करत होता. तेव्हा प्रियांका कौतुकाने बघत होती तर चिमुकली मालती खेळण्याच्या मूड मध्ये होती. 

प्रियांकाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी काही सेकंदात कमेंट्स करायला सुरुवात केली. किती गोड, मालतीचा चेहरा पहिल्यांदाच दिसला. नजर काढ'तिची अशी कमेंट एका चाहतीने केली. छोट्या मालतीने पांढऱ्या रंगाचा शर्ट तर त्यावर क्रीम कलरचा स्वेटर घातला होता. पांढऱ्या रंगाचं क्युट हेअरबॅंड तिने घातलं होतं. 

२०२२ मध्ये प्रियांकाने सरोगसीच्या माध्यमातून मुलीला जन्म दिला. काही दिवसांपूर्वीच ती एक वर्षाची झाली. याआधी नेहमीच प्रियांकाने मालतीचा चेहरा लपवला होता. मात्र आता तिचा चेहरा अखेर दिसला आणि चाहते भलतेच खूश झालेत.

टॅग्स :प्रियंका चोप्रापरिवारनिक जोनाससोशल मीडियाव्हायरल फोटोज्