Join us  

'चालत्या गाडीत निक जोनसने प्रियंकाचे केस...' भारताच्या जावयावर नेटकरी फिदा; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 3:04 PM

काही तासातच या पोस्टला लाईक्स आले असून भारतीय नागरिक तर जावयावर खूश झालेत.

अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) वेबसिरीज 'सिटाडेल' मुळे चर्चेत आहे. आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत ती कुटुंबासोबत जास्तीत जास्त राहते. तसंच तिच्या आणि निक जोनासच्या केमिस्ट्रीची नेहमीच चर्चा असते. हे बॉलिवूड आणि हॉलिवूडमधलं क्यूट कपल आहे असं म्हटलं जातं. नुकतंच प्रियंकाने पती निकसोबतचा (Nick Jonas) एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला आहे. काही तासातच या पोस्टला लाईक्स आले असून भारतीय नागरिक तर जावयावर खूश झालेत.

प्रियंका आणि निक विम्बल्डन बघण्यासाठी गेले होते. प्रियंकाने यावेळी गडद हिरव्या रंगाचा प्रिंटेड ड्रेस घातला होता. तिने पोनीटेल हेअरस्टाईल केली होती. तर निक जोनास व्हाईट शर्ट, चेक्स सूटमध्ये दिसला. विम्बलडनवरुन परतत असताना कारमध्ये प्रियंकाने व्हिडिओ शूट केला आहे. यामध्ये निक प्रियंकाची पोनी काढण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याला ती काही करुन काढताच येत नाही. निकचा हा प्रामाणिक प्रयत्न पाहून प्रियंकालाही हसू येतं. तिने हसत हसतच हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. तर'पोनी टेलची गुंतागुंत' असं कॅप्शनही दिलं आहे.

 त्यांच्या व्हि़डिओवर नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. विशेषत: भारतीयांना बेस्ट जावई मिळाला आहे' अशीही कमेंट एकाने केली आहे. निक आणि प्रियंका नेहमी त्यांच्या व्हिडिओंमुळे चर्चेत असतात. तसंच मुलगी मालती मेरीचेही क्युट फोटो व्हायरल होत असतात. निक आणि प्रियंकाचे 2018 मध्ये जोधपूर येथे ग्रँड वेडिंग पार पडले होते.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनाससोशल मीडिया