Join us  

छोट्या बहिणीला सपोर्ट करण्यासाठी प्रियंका चोप्रा आली पुढे, मनारा चोप्रासाठी लिहिली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 11:17 AM

'बिग बॉस'च्या घरात मनाराला पाहून चाहतेही थक्क झाले.

देसी गर्ल प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती अनेकदा तिच्या कुटुंबातील सदस्यांसह तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते. अभिनेत्री अनेकदा तिचा पती निक जोनास आणि लेक मालतीसोबतचे फोटो शेअर करत असते. आता, प्रियंकाची चुलत बहीण मनारा चोप्राने नुकतीच 'बिग बॉस 17' मध्ये एंट्री केली आहे. प्रियंकाने बहिणीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

प्रियंका चोप्राने इन्स्टाग्राम स्टोरीवर आपली चुलत बहिण मनारा चोप्रासोबतचा फोटो शेअर केला आहे. प्रियंकाने शेअर केलेला हा फोटो जुना आहे. हा फोटो प्रियंकाने मिस वर्ल्डची स्पर्धा जिंकली त्यावेळीचा आहे. यात ती मनारासोबत पोझ देताना दिसतेय. फोटो दोघी स्माईल देताना दिसतायेत.  

फोटोत प्रियंका चोप्राच्या डोक्यावर मिस वर्ल्डचा मुकूट दिसतोय. आपल्या लहान बहिणीच्या गळ्यात पीसी हात घालून उभी आहे.  हा थ्रो बॅक फोटो शेअर करत प्रियंकाने आपल्या धाकट्या बहिणीला शुभेच्छा दिल्या आहे. गुड लक लिटिल वन असं तिने लिहिले आहे. सोबतचा हार्टवाला इमोजीसुद्धा शेअर केला आहे.  

मनारा ही प्रियंकाची आते बहीण आहे. मनाराची आई कामिनी चोप्रा या प्रियंकाच्या बाबांची बहीण आहे. मनारा प्रियंका आणि निक जोनसच्या लग्नाला उपस्थित होती. मनाराने  'जिद' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. बिग बॉसमध्ये मनारा कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्याबाबत काय खुलासे करते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.  

टॅग्स :प्रियंका चोप्राबिग बॉस