'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनास (Nick Jonas) पहिल्यांदाच आई-बाबा झाले आहेत. सोशल मीडियावर, प्रियांका चोप्राने स्वतः ही आनंदाची बातमी (Priyanka and Nick welcome baby)चाहत्यांना दिली, ज्यानंतर चाहते आणि सेलिब्रिटी तिचे अभिनंदन करत आहेत. प्रियांकाच्या या सरप्राईजने चाहतेही खूप खूश आहेत. लग्नाच्या 3 वर्षानंतर प्रियंका आणि निक जोनासच्या घरी पालणा हलला आहे. प्रियांका सरोगसीद्वारे आई झाली आहे. प्रियांकाला आई व्हायची इच्छा होती, याचा खुलासा तिनेच एका मुलाखतीदरम्यान केला होता.
प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra) ही ग्लोबल स्टार असून सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही जाणून घ्यायचे आहे. नुकतीच प्रियांकाने एक पोस्ट शेअर करून ती आई झाल्याचे सांगितले. पीसीने 2019 मध्येही सांगितले होते की तिला आई व्हायचे आहे.
एका मुलाखतीदरम्यान प्रियांका चोप्रा फॅमिली प्लॅनिंगबाबत बोलली होती, ती म्हणाली होती, 'मला नेहमीच आई व्हायचं होतं, पण मला वाटते हे तेव्हाच होईल जेव्हा देवाची इच्छा असेल'.
लग्नाच्या ३ वर्षानंतर प्रियांका चोप्रा आणि निक जोनास आई-बाबाझाले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रियांकाने लिहिले- "आम्ही सरोगसीद्वारे आमच्या घरात बाळाचे स्वागत केले आहे. ही बातमी साऱ्यांना सांगताना मला खूपच आनंद होतोय. या आनंदाच्या आणि खास क्षणांमध्ये आम्ही आमच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवणार आहोत. साऱ्यांचे धन्यवाद!", अशी पोस्ट प्रियांकाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर केली आणि साऱ्यांना खुशखबर दिली.