बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून अभिनेत्री प्रियंका चोप्रा आता केवळ अभिनेत्री, निर्माती राहलेली नाही. लेखिका ही तिची नवी ओळख आहे. नुकतेच तिचे ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. प्रियंकाचे हे पुस्तक सध्या खूप चर्चेत आले आहे. या पुस्तकात प्रियंकाने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसांमध्येच ते न्यूयॉर्क टाइम्सच्या यादीत 'बेस्ट सेलर' म्हणून जाहीर करण्यात आले.
प्रियांका चोप्राने या बायोग्राफीमध्ये आपल्या जीवनाशी संबंधित अनेक किस्से शेअर केले आहेत. तसेच अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे, ज्याबाबत माहिती करून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. यामुळेच प्रियांकाच्या या पुस्तकाची सर्वत्र चर्चा होत आहे. त्यातच आता या पुस्तकाची हिंदी आवृत्ती प्रकाशित होणार असल्याने बॉलिवूडमधील चाहत्यांनाही ते उपलब्ध होणार आहे.