मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक यांच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली आहे. आता तर हे दोघे लग्न करणार असल्याचीही चर्चा होत आहे. यात तथ्य असल्याचे संकेत म्हणजे दोघे हळूहळू एकमेकांच्या परिवारांसोबत जवळीक वाढवताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वीच निक जोनसच्या भावाने प्रियंकाचं भरभरुन कौतुक केलं होतं. त्यानंतर प्रियंकाने निकच्या वडिलांना इन्स्टाग्रामवर फॉलो करणे सुरु केले. तसेच प्रियंका निकच्या नातेवाईकाच्या लग्नातही एकत्र दिसले होते. आता निकने प्रियंकाच्या परिवारासोबत जवळीक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, निक जोनस लवकरच प्रियंकासोबत भारत दौऱ्यावर येणार आहे. आणि या भेटीत तो प्रियंकाच्या आईला भेटणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका तिच्या आयुष्यातील सर्वात व्यक्ती म्हणजे तिच्या आईला भेटवणार आहे.
प्रियंकाचा हा बॉयफ्रेन्ड तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. पण प्रियंकाच्या इच्छा पूर्ण करण्यात तो कुठेही मागे नाहीये. दोघेही सतत एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत. एकीकडे बॉलिवूडमधील वेगवेगळे कपल्स लग्न करण्याच्या मार्गावर असताना प्रियंकाच्या लग्नाचा अंदाज लावला जात आहे.