ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा येत्या २ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवन येथे लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्नाला केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्र तेवढेचं उपस्थित राहणार आहेत. सुमारे ८० लोकांच्या उपस्थितीत हा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे. याच शाही विवाहाबद्दलची ताजी बातमी म्हणजे, लग्नात सामील होणा-या पाहुण्यांना प्रियांका व निक एक खास भेट देणार आहेत. होय, या पाहुण्यांना स्पेशल पर्सनलाईज्ड चांदीचे नाणे भेट म्हणून दिले जाणार आहे. या नाण्याच्या एका बाजूला ‘एनपी’ म्हणजे निक व प्रियांका या नावाचे इंग्रजी आद्याक्षर लिहिलेले असेल. तर दुसºया बाजूला गणेश आणि लक्ष्मीची प्रतिमा कोरलेली असेल.
अद्याप प्रियांका व निकने लग्नाची अधिकृत तारीख जाहिर केलेली नाही. मात्र येत्या २९ नोव्हेंबरपासून या लग्नाचे विधी सुरू होणार आहेत. यासाठी जोधपूरचे उमेद भवन पाच दिवसांसाठी बुक करण्यात आले आहे. लग्नविधी सुरू करण्यापूर्वी २८ तारखेला प्रियांका व निक एक लहानशी पूजा बांधणार आहेत. वेडिंग वेन्यूपर्यंत प्रियांका व निक दोघेही हेलिकॉप्टरने पोहोचणार आहेत. लग्नाचे व-हाडीही जोधपूर एअरपोर्टवरून हेलिकॉप्टरनेच थेट वेडिंग मेन्यूपर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे उमेद पॅलेसमध्ये एक हेलिपॅड उभारण्यात येत आहे. निक आणि प्रियांका दोघेही प्रचंड प्रसिद्ध असल्याने त्यांच्या लग्नाची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो एका इंटरनॅशनल पब्लिकेशनला त्यांनी १८ कोटीला विकले गेले असल्याचेही कळतेय. २९ नोव्हेंबरला प्रियांकाच्या हातांवर निकच्या नावाची मेहंदी रचेल. यानंतर ३० नोव्हेंबरला जोधपूरच्या मेहरानगड किल्लयात संगीत सेरेमनी होईल. याच दिवशी प्रियांका व निक कॉकटेल पार्टी होस्ट करतील. यात केवळ प्रियांका व निकचे जवळचे मित्र व नातेवाईक सामील होतील. १ डिसेंबरला हळदीचा कार्यक्रम होईल. २ डिसेंबरला प्रियांका व निक लग्नबंधनात अडकतील.२ डिसेंबरला हिंदू पद्धतीने तर ३ डिसेंबरला हे कपल ख्रिश्चन पद्धतीने रेशीमगाठीत अडकणार आहे. दोन्ही पद्धतीने लग्न एकाच ठिकाणी पार पडणार आहे. लग्नानंतर प्रियांका-निक दोन रिसेप्शन देतील. यापैकी एक दिल्लीत होईल तर दुसरे मुंबईत.