जोधपूरच्या उमेद भवनात प्रियांका चोप्राच्या लग्नाचे सेलिब्रेशन सुरु आहे. शनिवारी प्रियांकाची मेहंदी व संगीत सेरेमनी रंगली. मात्र या सेरेमनीपूर्वी प्रियांकाच्या जखमी झाली.होय, पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, मेहंदी सेरेमनीदरम्यान प्रियांकाच्या पायाला दुखापत झाली. यानंतर डॉक्टरला बोलवून पीसीच्या पायाला बँडेज बांधावे लागले. सेलिब्रेशनदरम्यान तिला वेदना होऊ नये़, यासाठी पेनकिलरही देण्यात आले.प्रियांका उमेद भवनाच्या ज्या खोलीत थांबली होती, तिथे वुडन फ्लोर होते. फ्लोरचे काही काम सुरू होते. फ्लोरवरून चालताना पीसीच्या पायाला काहीतरी रूतले आणि तिच्या पायातून रक्त वाहू लागले. यानंतर लगेच डॉक्टरला बोलवण्यात आले. प्रियांकाच्या हातावर मेहंदी सजली, तेव्हा तिच्या पायावर क्रेप बँडेत बांधलेले होते. अर्थात तरिही प्रियांकाने लग्नाचा प्रत्येक सोहळा एन्जॉय केला.
Priyanka Nick Wedding : मेहंदी सेरेमनीपूर्वी प्रियांकाच्या पायाला झाली दुखापत, बोलवावा लागला डॉक्टर!!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 7:20 PM
जोधपूरच्या उमेद भवनात प्रियांका चोप्राच्या लग्नाचे सेलिब्रेशन सुरु आहे. शनिवारी प्रियांकाची मेहंदी व संगीत सेरेमनी रंगली. मात्र या सेरेमनीपूर्वी प्रियांकाच्या जखमी झाली.
ठळक मुद्दे, मेहंदी सेरेमनीदरम्यान प्रियांकाच्या पायाला दुखापत झाली. यानंतर डॉक्टरला बोलवून पीसीच्या पायाला बँडेज बांधावे लागले.