ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा येत्या २ डिसेंबरला अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नगाठ बांधणार आहेत. काल प्रियांका व निक आपआपल्या कुटुंबासोबत जोधपूरला पोहोचलेत. त्यांना पाहून चाहते आणि मीडियाने एकच गर्दी केली. के्रझी चाहत्यांनी प्रियांकाचे जोरदार स्वागत केले. हे स्वागत पाहून प्रियांका व निक दोघेही भारावले. दोघांनीही हात जोडून अभिवादन करत चाहत्यांचे आभार मानलेत. यानंतर निकयांकाच्या लग्नविधीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. प्रियांकाच्या हातावर निकच्या नावाची मेहंदी सजली. यानंतर संध्याकाळी उमेद भवनच्या विन्टेज जॉनमध्ये शाही मेजवानी आयोजित केली गेली. आज शुक्रवारी निक व प्रियांकाची संगीत सेरेमनी रंगणार आहे. यादरम्यान प्रियांका व निक दोघेही परफॉर्म करणार आहेत.संगीत सेरेमनीत प्रियांका तिची आई मधू चोप्रा हिच्यासोबत डान्स परफॉर्मन्स देणार आहे.
प्रियांका व निकच्या शाही लग्नासाठी जोधपूरचे उमेद भवन अगदी नववधूप्रमाणे नटले आहे. अख्खा महल लाईट्सच्या झगमगाटाने न्हाऊन निघाले आहे. उमेद भवनाचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
प्रियांका व निकच्या लग्नामुळे उमेद भवन सामान्यजनांसाठी पाच दिवस बंद ठेवण्यात आले आहे.येत्या २ डिसेंबरला प्रियांका व निकचे शुभमंगल आहे. प्रियांकाच्या लग्नाला काही इंटरनॅशनल स्टार हजेरी लावणार असल्याचीही खबर आहे. या लग्नाला केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्र तेवढेचं उपस्थित राहणार आहेत. सुमारे ८० लोकांच्या उपस्थितीत हा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे.