अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि प्रीती झिंटानंतर मॅगीच्या वादात बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राही सहभागी झाली आहे. प्रियंकाचे म्हणणे आहे, की जंक फूडसारख्या पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची जबाबदारी आहे की त्यांनी बनवलेल्या पदार्थांचा लोकांच्या स्वास्थ्यावर काही वाईट परिणाम होऊ नये. जर असे होत असेल तर या वस्तंूची जाहिरात करणाऱ्या सेलीब्रिटींची यात काय चूक आहे? मात्र ती अमिताभ, माधुरी, प्रीती यांची बाजू घेत म्हणाली, की मी जंक फूडचा प्रचार करणार, ज्याला काही अडचण असेल तो ती वस्तू खाणे बंद करेल. भोपाळमध्ये एका यूनिसेफच्या कार्यक्रमात बोलताना प्रियंका म्हणाली, की जेव्हा आम्ही खाद्य पदार्थाच्या जाहिरातीचे कॉन्ट्रॅक्ट साइन करतो, तेव्हा त्यावर असे लिहिलेले असते की हा पदार्थ पूर्णपणे सुरक्षित आहे. आता माझ्या घरी काही लॅब नाही, की मी त्या वस्तूची परीक्षा करून पाहू. कंपनी आम्हाला जी माहिती देते, त्यावर आम्ही विश्वास ठेवतो. मात्र जर तो पदार्थ खराब असेल तर आम्ही त्याची जाहिरात करणे बंद करतो. पण त्याची विक्री सुरू असेल तर आम्ही त्याला विकत राहतो. ज्याला अडचण असेल तो व्यक्ती ‘तो’ पदार्थ खाणे किंवा खरेदी करणे बंद करेल.
प्रियंका करणार जंक फूडचा प्रचार
By admin | Published: July 06, 2015 2:57 AM