ऑनलाईन लोकमत
दिल्ली, दि. 4- प्रियंका चोप्रा लवकरच व्हाईट हाऊसमधील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि मिशेल ओबामांसोबत दिसण्याची शक्यता आहे. प्रियंका चोप्राला व्हाईट हाऊसमधून या वर्षीचं जेवणाचं निमंत्रण मिळालं आहे. प्रियंका चोप्रा हा क्षणाचा आनंद द्विगुणित करणार आहे. सा-या जगाचं मन जिंकणा-या प्रियंका चोप्राला 2016चा ऑस्कर पुरस्कार देण्याचा सन्मानही मिळवला होता. आता तिची व्हाईट हाऊसच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. या वर्षीच्या बराक ओबामांच्या जेवणाच्या पंक्तीत प्रियंका चोप्राचाही समावेश होण्याची शक्यता आहे. प्रियंका चोपा यावेळी हॉलिवूड अभिनेत्री ब्रडली कूपर, लुसी लियू, जेन फोंडा या अभिनेत्रींसोबत सोबत जेवणाच्या पंक्तीत दिसणार आहे. यावेळी अमेरिकेत पहिल्यांदाच बाजीराव मस्तानी सिनेमातील स्टार कास्ट टीमही पहिल्यांदाच अमेरिकेत या जेवणाच्या दावतीला उपस्थिती लावणार आहे.