Join us

म्हणून प्रत्येक कलाकाराचे Oscar मिळवण्याचे असते स्वप्न , विजेत्याला मिळणारी रक्कम वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 12:57 PM

बॉलिवूड अभिनेता दिवंगत इरफान खान आणि ऑस्कर विजेत्या प्रख्यात वेशभूषाकार दिवंगत भानू अथय्या यांना या सोहळ्यात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

ऑस्कर पुरस्कार हा एन्टरटेनमेंट जगातील सर्वांत मोठा आणि मौल्यवान पुरस्कार मानला जातो. ऑस्कर नामांकनांच्या यादीमध्ये स्थान मिळावे यासाठी तसेच पुरस्कारासाठीच्या शर्यतीत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करावे यासाठी जगभरातील फिल्म मेकर्स खूप प्रयत्न करतात. जगभरात सर्वाधिक चर्चेत आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी केवळ नऊ चित्रपट अंतिम निवडीपर्यंत पोहोचतात आणि त्यापैकी फक्त पहिल्या पाच चित्रपटांना नामांकन मिळते आणि त्यापैकी एक चित्रपटाला ऑस्कर दिला जातो.

विशेष म्हणजे  इतके पुरस्कार असताना ऑस्करवर कलाकाराची नजर का असते? प्रत्येक कलाकारासाठी  'ऑस्कर' मिळणे नक्की गौरवास्पद असते. प्रत्येकाचा या पुरस्काराने सन्मान व्हाव असे वाटत असते. प्रत्येकाला पुरस्कारा का हवाहवासा वाटतो ? हा पुरस्कार मिळाल्यानंतर कलाकाराला नेमका काय फायदा होत असेल असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असणारच. तर ऑस्कर पुरस्काराने कलाकाराला फारसा आर्थिक फायदा होत नाही. याला कारणही तसेच आहे.

हा पुरस्कार नावाने खूप मोठा मानाचा पुरस्कार वाटत असला तरी ऑस्कर पुरस्काराची ट्रॉफी सोनं आणि ब्रिटेनिअमपासून बनवण्यात आलेली असते. याची किंमतही जवळपास 70 हजार रुपये इतकी असण्याची शक्यता आहे याहून जास्त नाही. यासोबत एक प्रशस्तीपत्रक दिलं जाते. यासोबत भारतीय चलनानुसार  जवळपास 18 लाख रुपयांचं एक गिफ्ट वाऊचर देण्यात येतं. या व्हावचरची  किंमत कमी अधिक असू शकते. 

ऑस्करपासून कलाकाराला  फारसा आर्थिक लाभ होत नसला तरी कलाकाराला इंडस्ट्रीत प्रतिष्ठा मिळते. या पुरस्काने सन्मानित झाल्यानंतर आपसुकच इतर प्रोजेक्टचे काम मिळु लागेत. इतर संधील त्याच्यासाठी उपलब्ध होतात. त्यामुळे पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवून देणारा ऑस्कर पुरस्कार प्रत्येक कालाकाराला हवाहवासा वाटतो.

ऑस्कर सोहळ्यात भारताच्या वाट्याला काय आले तर एक भावुक क्षण...! इरफान, भानू यांना श्रद्धांजली

यंदाच्या या सोहळ्यात ना होस्ट होता, ना प्रेक्षक. डॉल्बी थिएटरमध्ये रंगलेल्या या सोहळ्यात भारताच्या वाट्याला काय आले तर एक भावुक क्षण. होय, बॉलिवूड अभिनेता दिवंगत इरफान खान ( Irrfan Khan)आणि ऑस्कर विजेत्या प्रख्यात वेशभूषाकार दिवंगत भानू अथय्या (Bhanu Athaiya) यांना या सोहळ्यात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा क्षण तमाम भारतीय प्रेक्षकांना भावुक करणारा ठरला.

टॅग्स :ऑस्करइरफान खान