Join us

हिरॉईनची नाही तर हिरोची भूमिका साकारणार भूमी पेडणेकर, हा घ्या पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 19:00 IST

भूमी पेडणेकर आता साकारणार हिरोची भूमिका

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने दम लगा के हईशा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने बऱ्याच चित्रपटामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर तिने अधिराज्य गाजवले आहे आणि कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. आता तर चक्क ती हिरॉईनची नाही तर हिरोची भूमिका साकारताना दिसणार आहे. हे खुद्द तिनेच सांगितलं आहे.

होय, भूमी पेडणेकर हिने इंस्टाग्रामवर आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. या फोटोत भूमी सोबत अक्षय कुमार, भूषण कुमार व दिग्दर्शक अशोक आहेत. या फोटोमध्ये सगळ्यांचं लक्ष भूमीच्या हातातल्या पाटीनं वेधून घेतलं आहे. 

भूमीच्या या चित्रपटाचं नाव दुर्गावती असून यात ती दुर्गावतीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा करत भूमीने फोटो शेअर करत इंस्टाग्रामवर लिहिलं की, बऱ्याच कालावधीपासून या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला सांगण्याची मी वाट पाहत होते. माझ्या आगामी प्रोजेक्ट दुर्गावतीची घोषणा करताना मी खूप उत्सुक आहे. हा भयावह थरारपट आहे आणि जानेवारीच्या मिडमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. अक्षय कुमार सरांचे आभार मानते कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे.

भूमी पेडणेकरचा नुकताच 'सांड की आंख' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत तापसी पन्नू ही सुद्धा मुख्य भूमिकेत होती. शूटर दादी नावाने ओळखल्या जाणाऱ्या दोन महिलांची भूमिका त्या दोघींनी साकारल्या होत्या. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

आता भूमी पेडणेकर पति पत्नी और वो या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन व अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत.

याशिवाय भूमी डॉली किटी और वो चमकते सितारे या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री कोंकणा सेन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

टॅग्स :भूमी पेडणेकर अक्षय कुमारभुषण कुमार