‘संशय विकृती’ हा मानसिक आजार सध्या मोठ्या प्रमाणात दिसतो. परक्या, लांबच्या माणसांच्या बाबतीत संशयाचे भूत मानगुटीवर बसलं तर जोर लावून काढता येतं, आपल्या जवळच्या माणसांविषयी संशय मनात फेर धरायला लागला की मग जे होतं ते शब्दातं व्यक्त करणं देखील अवघड बनतं, अशाच मानशास्त्रीय पद्धतीने वेध घेतलेले ‘कवडसा’ हे नाटक अब नॉर्मल होम’ने निर्मित केले आहे. निमोर्ही क्रिएशंस प्रस्तुत, माणूस लिखित, पंकज मिठभाकरे दिग्दर्शित या नाटकात प्रवीण चौगुले, माधुरी जोशी, किशोरी पाठक, प्रसाद कुलकर्णी आणि अमोल पाठक यांच्या प्रमुख भूमिका असून, दिग्दर्शकाने मानसशास्त्रीय ट्रिटमेंट देऊन विषयानुरूप नाटकाला झालर लावली आहे. नाटक बघत असताना प्रेक्षकांना स्वत:च्या आयुष्याशी साधर्म्य जाणवेल, ते तसं जाणवावं... प्रेक्षकांनी हे नाटक बघताच स्वत:कडे बघावं, असा लेखक- दिग्दर्शक पंकज मिठभाकरे यांचा मनोदय आहे. नाटकाचा पडदा पडेल तेव्हा रंगमंचावरचं नाटक संपेल, प्रेक्षकांनी या नाटकातून स्वत:कडे, आपल्या मानसिक प्रश्नांकडे आणि मानसिक आजारी व्यक्तींच्या प्रवासाकडे जाणीवपूर्वक पाहावे, हाच नाटकाचा मुख्य उद्देश आहे. नेपथ्य- सागर गायकवाड, प्रकाशयोजना- अनुप देशपांडे - संतोष लोखंडे, संगीत- निखिल लांजेकर, वेशभूषा- मेघना मिठभाकरे, रंगभूषा- पंकजा पेशवे यांचे आहे.
मानसशास्त्रीय पद्धतीने वेध घेतलेला ‘कवडसा’
By admin | Published: October 25, 2015 3:06 AM