Join us

लोकमतमध्ये बाजी

By admin | Published: February 05, 2015 12:00 AM

सध्या चर्चेचा विषय असलेल्या वादग्रस्त एआयबी व्हिडीओबद्दल श्रेयसला विचारले असता मला त्या प्रकारचे शो आवडत नसल्याचे तो म्हणाला. ...

सध्या चर्चेचा विषय असलेल्या वादग्रस्त एआयबी व्हिडीओबद्दल श्रेयसला विचारले असता मला त्या प्रकारचे शो आवडत नसल्याचे तो म्हणाला. आजची तरुणाई अशा प्रकारच्या बॉलीवूड कलाकारांना रोल मॉडेल म्हणत अनुकरण करत असेल तर ते चुकीचेच आहे असेही त्याने सांगितले.

दिग्दर्शक निखिल महाजन म्हणाला की बाजीसारखा काल्पनिक चित्रपट करताना लोकांना सिनेमॅटिक एक्सपिरियन्स मिळाला पाहिजे हे डोक्यात होतं. त्याप्रमाणे लोकांच्या आवडीचा विचार केला.

माझ्यासारख्या ग्लॅमरस मुलीला नो मेकअप लूक देण्याचं श्रेय हे निखिलचं असल्याचे अमृता म्हणाली. श्रेयस जितेंद्रबरोबर काम करण्याचं खूप दडपण होतं. गौरी करताना खूप मजा आली असेही अमृता म्हणाली. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नाशिकमध्ये अमृता दगडफेकीत जखमी झाली. टवाळखोरांनी भिरकावलेला दगड अमृताच्या कानाजवळ लागला. या बद्दल सुरू असलेल्या चर्चेबाबत अमृता म्हणाली की ही दगडफेक कुणी जाणीवपूर्वक केलेली नसावी उत्साहाच्या भरात हा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे

मार्तंडसारखा खलनायक रंगवण्यासाठी जितेंद्र जोशीलाही मेहनत घ्यावी लागली. मार्तंड हा स्वत:चे निरस जगणं जगतोय. त्याला दरम्यान भूतकाळातल्या गोष्टींची उकल होऊन जगण्यातला दुष्ट उद्देश सापडतो असे तो म्हणाला.

आपल्याकडे काल्पनिक गोष्टी आवडीने वाचल्या जातात. याच गोष्टींच्या धर्तीवर बनलेला बाजी चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने श्रेयस तळपदे जितेंद्र जोशीअमृता खानविलकर आणि दिग्दर्शक निखिल महाजन यांनी लोकमत कार्यालयात भेट दिली आणि मनोरंजक गोष्टींचा पटच यानिमित्ताने उलगडला.

चित्रपटासाठी श्रेयसला थरारक दृश्ये देताना हातालाही दुखापत झाली. पण मराठमोळा सुपरहीरो साकारण्यासाठी कोणतीच कसर बाकी ठेवली नाही. बाजी हा सामान्य माणसासारखाच हीरो आहे. सामान्य लोकही त्याला आपल्यात बघू शकतात असे श्रेयसने सांगितले. बाजी हा हीरो नसून ती वृत्ती आहे. एखादी घटना घडल्यास ती वृत्ती जागी होते आणि त्यानंतर लोकांसाठी समाजासाठी लढा देते. (सर्व छायाचित्र - दत्ता खेडेकर)