गत १४ फेबु्रवारीला जम्मू काश्मिरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे बॉलिवूडमध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. बॉलिवूडच्या अनेकांनी या भ्याड हल्ल्याची निंदा करत, हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. आता यापुढे जात, इंडस्ट्रीने पाकिस्तानी कलाकारांवर पूर्णपणे बंदी लादली आहे. फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पॉईजने पाकी कलाकारांसोबत काम न करण्याचा निर्णय जाहिर केला आहे. म्युझिक कंपनी टी-सीरिजनेही पाकिस्तानी गायकांनी गायलेली गाणी हटवली आहेत. यात पाकिस्तानी गायक आतिफ असलम आणि राहत फतेह अली खान अशा पाकी गायकांचा समावेश आहे. सलमान खान यानेही पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ आतिफ असलमने गायलेले एक गाणे आपल्या चित्रपटातून काढून टाकले आहे. सलमान खान निर्मित ‘नोटबुक’मध्ये आतिफ असलमने गायलेले एक गाणे होते. हे गाणे गाळण्याचा आदेश सलमानने दिला आहे.
सलमान खानने ‘या’ चित्रपटातून गाळले पाकी सिंगर आतिफ असलमचे गाणे!!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 10:11 AM
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे बॉलिवूडमध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. बॉलिवूडच्या अनेकांनी या भ्याड हल्ल्याची निंदा करत, हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. आता यापुढे जात, इंडस्ट्रीने पाकिस्तानी कलाकारांवर पूर्णपणे बंदी लादली आहे.
ठळक मुद्देनोटबुक’ या चित्रपटातून मोहनीश बहल याची मुलगी प्रनुतन आणि जहीर इक्बाल हे दोन नवे चेहरे बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहेत.