आपण कितीही प्रगती केली... कितीही नवनवी शिखरं गाठली... तरीसुद्धा या भारतमातेसाठी बलिदान देणा-या वीरपुत्रांचे पांग फेडू शकत नाही.. आजही नापाक हल्ल्यात भारताचे सुपुत्र शहीद होतायत. काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटकं असल्यानं बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 38 जवान शहीद झाले. तर अनेक जवान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर वेगवेगळ्या स्तरावरून प्रतिक्रिया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर सेलिब्रेटी मंडळींनीही हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली असून, दुसरीकडे आता नेटीझन्सने कपिल शर्मावर निशाणा साधला आहे.
त्यामुळे कपिलने पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या सिद्धूसोबत काम करणं थांबवावं अन्यथा आम्ही हा शो पाहणं बंद करू असा इशारा नेटकऱ्यांनी दिल्याचे पाहायला मिळतंय. यावर कपिल आणि शोच्या टीमकडून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही.