Join us

पुष्कर जोग आणि सई लोकूर आले एकत्र, 'सनम हॉटलाईन'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 19:22 IST

बिग बॉस मराठी या शोनंतर पुन्हा एकदा पुष्कर जोग आणि सई लोकूर एकत्र आले आहेत.

ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर वेगवेगळ्या वेब सीरिज निर्माण होत आहेत. त्यात मराठी वेब सीरिजही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहेत. त्यात आता एमएक्स प्लेअरवर पुष्कर जोग, सई लोकूर यांची भूमिका असलेल्या सनम हॉटलाईन ह्या धमाकेदार वेब सीरिजची ८डिसेंबरपासून भर पडणार आहे. नुकतेच या वेब सीरिजचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. 

तीन मित्र मिळून सर्वांसाठी  सनम हॉटलाईन सुरू करतात आणि त्यातून पुढे काय काय होत जात अशा  धमाल कथेवर ही वेब सीरिज बेतली आहे. या  वेब सीरिजमध्ये पुष्कर जोग आणि सई लोकूर यांच्यासह विनय येडेकर, उदय नेने असे अनुभवी कलाकार दिसणार आहेत. 

कॅफेमराठी स्टुडीओजच्या निखिल रायबोले, भूपेंद्रकुमार नंदन निर्मित, आकाश गुरसळे दिग्दर्शित आणि शिरीष लाटकर लिखित "सनम हॉटलाईन" ही वेबसिरीज मराठी आणि हिंदी भाषेत हंगामा प्ले, एम एक्स प्ले, व्ही आय मुव्हीज, एअरटेल एक्सट्रीम्स आणि त्याच्या सर्व पार्टनर नेटवर्कवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे. धमाल कथानक, उत्तम कलाकार असा मिलाफ सनम हॉटलाईन या वेब सीरिजमध्ये झाला असून, ही सीरिज नक्कीच प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करेल यात शंका नाही.

सई लोकूर नुकतीच तीर्थदीप रॉयसोबत लग्नबेडीत अडकली आहे. बिग बॉस मराठी शोमधून ती घराघरात पोहचली आहे. याच सीझनमध्ये अभिनेता पुष्कर जोगही सहभागी झाला होता. त्यामुळे आता हे दोघे बिग बॉसनंतर सनम हॉटलाइनमध्ये दिसणार आहेत.

टॅग्स :पुष्कर जोगसई लोकूर