कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सदस्यांना बिग बॉसने एक सुरेख सरप्राईझ दिले. मागील आठवड्यामध्ये झालेल्या WEEKEND चा डाव मध्ये सदस्यांनी केलेल्या आग्रहाखातर महेश मांजरेकरांनी मी नक्कीच एक दिवस घरामध्ये येईन असे सांगितले होते आणि काल महेश मांजरेकर त्यांच्या पत्नीसोबत घरामध्ये आले. सगळे सदस्य त्या दोघांना अचानक बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहून आनंदित झाले. मेधा मांजरेकर यांनी सदस्यांसाठी खास घरून काही गोष्टी बनवून आणल्या होत्या. काल बिग बॉसने महेश मांजरेकरांच्या साक्षीने “तिकीट टू फिनाले” हे कार्य पार पडेल असे घोषित केले. ज्यामध्ये स्मिता गोंदकर, सई लोकूर, पुष्कर जोग आणि शर्मिष्ठा राऊत यातील कोणत्या सदस्याला “तिकीट टू फिनाले” मिळाले पाहिजे आणि का हे त्यांनी महेश मांजरेकर यांना सांगायचे होते. यामध्ये स्मिताने शर्मिष्ठाचे नाव घेतले तर शर्मिष्ठाने पुष्करचे. सईने पुष्करचे नाव घेतले तर पुष्करने सईचे नाव घेतले. अशाप्रकारे चार पैकी दोन मतं मिळून पुष्करला “तिकीट टू फिनाले” हे बिग बॉस कडून रिटर्न गिफ्ट मिळाले. तो थेट महाअंतिम फेरीमध्ये पोहचणारा पहिला सदस्य ठरला आहे. इतकेच नसून तो येणाऱ्या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेमधून देखील सुरक्षित झाला आणि बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनचा शेवटचा कॅप्टन होण्याचा मान त्याला मिळाला असे बिग बॉसने काल घोषित केले. आज WEEKEND चा डाव मध्ये काय होणार? उद्या कोण घराबाहेर पडणार? कोणाला प्रेक्षक सुरक्षित करणार? हे पाहाणे रंजक असणार आहे.
आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक टास्क रंगणार आहे. बिग बॉसचे घर तेजोमय व्हावं यासाठी आज बिग बॉस सदस्यांवर फिलिप्स प्रस्तुत “तेजोमय टीबल्ब” हे कार्य सोपवणार आहेत. या कार्यासाठी घरामध्ये फिलिप्स टीबल्ब झोन बनविण्यात येणार आहेत. या कार्यामध्ये कोण विजयी ठरेल हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.
पुष्कर जोगनंतर आता कोणचा स्पर्धक फायनलमध्ये धडक मारतो हे प्रेक्षकांना लवकरच कळणार आहे.