Join us

ऐन गुलाबी थंडीत आलं पुष्कर जोगचं नवीन गाणं; 'बायडी'मध्ये दिसला अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 15:55 IST

नववर्षाच्या सुरुवातीला पुष्कर 'बायडी' हे नवं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकतंच त्याचं हे गाणं प्रदर्शित झालं आहे.

पुष्कर जोग हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. जबरदस्त या सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या पुष्करने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच त्याचा 'धर्मा : द AI स्टोरी' सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता नववर्षाच्या सुरुवातीला पुष्कर बायडी हे नवं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकतंच त्याचं हे गाणं प्रदर्शित झालं आहे.

गुलाबी थंडीत पुष्कर जोगचं हे  नवीन रोमँटिक कथा दर्शवणारं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ गाण्यात अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री पूजा राठोड हे प्रमूख कलाकार आहेत तर या गावरान प्रेम गीताचे निर्माते विशाल राठोड हे आहेत. या गाण्याचे दिग्दर्शक अभिजीत दाणी हे असून प्रसिद्ध गायक हर्षवर्धन वावरे आणि गायिका कस्तुरी तांबट यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्याच संगीत प्रितेश मावळे याने केले आहे. सोशल मीडियावर या गाण्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 

अभिनेता पुष्कर जोग गाण्याबाबत म्हणाला,”मला नवनवीन प्रोडक्शन्स सोबत काम करायला फार आवडत. मला या गाण्यासाठी विचारण्यात आलं तेव्हा मी त्यांना हो सांगितलं. गाणं नाशिकमध्ये शूट करताना खूपच जास्त मज्जा आली. गाण्याच्या हुक स्टेप फार कॅची आहेत. त्यामुळे गाण्याच्या रिहर्सलला आम्ही फार धम्माल केली. वी आर म्युझिक स्टेशनचे मी आभार मानतो की त्यांनी मला या गाण्यात संधी दिली. सोशल मीडियावर मला कमेंट्स येत आहेत ‘क्यूट डीजेवाला’ हे पाहून फार आनंद झाला. या गाण्यावर प्रेक्षकांनी प्रेम करावे हीच अपेक्षा आहे". 

अभिनेत्री पूजा राठोड म्हणाली, ”पुष्कर सर यांच्यासोबत गाण्यात काम करण्याची संधी मला वी आर म्युझिक स्टेशन यांनी दिली त्यामुळे मी त्यांचे आभारी आहे. माझ्यासाठी हे गाण म्हणजे ड्रीम कम ट्रू असा मोमेंट होता. पुष्कर सरांसोबत गाण शूट करताना खूप मज्जा आली. सोशल मीडियावर या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे गाण लवकर सुपरहिट व्हाव हीच इच्छा".

टॅग्स :पुष्कर जोगमराठी अभिनेतासेलिब्रिटी