Join us

अभिनयाव्यतिरिक्त पैसे कमावण्यासाठी पुष्कर श्रोत्री करायचा हे काम, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 16:37 IST

Pushkar Shotri : नाटक, सिनेमा, मालिका, सूत्रसंचालन अशा विविध माध्यमांमधून घराघरांत पोहोचलेले पुष्कर श्रोत्री यांनी आपल्या आयुष्यातील एक गुपित सगळ्यांसमोर उघड केलं आहे.

नाटक, सिनेमा, मालिका, सूत्रसंचालन अशा विविध माध्यमांमधून घराघरांत पोहोचलेले पुष्कर श्रोत्री यांनी आपल्या आयुष्यातील एक गुपित सगळ्यांसमोर उघड केलं आहे. खरं तर कलाकारांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. त्यातही हे कलाकार फवल्या वेळात काय करतात, असा प्रश्न नेहमीच अनेकांना पडतो.

पुष्कर श्रोत्री यांनी याच रहस्याचा उलगडा प्लॅनेट मराठीवरील 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॉक शोमध्ये केला आहे. पुष्कर हे फावल्या वेळात रिक्षा चालवायचे आणि त्यातून पैसे कमवायचे. आता ते असं का करायचे, यामागचं मुख्य कारण काय? याचे उत्तर तुम्हाला शुक्रवारी म्हणजेच १७ फेब्रुवारी रोजी मिळणार आहे. 

यावेळी या शोमध्ये पुष्कर श्रोत्री यांच्यासोबत संदीप पाठकही आहेत. ‘आपल्या देशाचं कालचं, आजचं आणि उद्याचं राजकारणही रस्ते देऊ, पाणी देऊ आणि वीज देऊ याभोवतीच फिरणार आहे. यातून आपण कधी बाहेर पडणार आहोत, असा प्रश्न या शोमध्ये संदीप पाठक यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे यंदाच्या एपिसोडमध्ये वातावरणात थोडं गांभीर्य येणार आहे. या भागात पुष्कर आणि संदीप यांनी त्यांच्या कारकिर्दीतील काही धमाल किस्से शेअर केले आहेत. सोबतच सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवरही आपली परखड मत व्यक्त केली आहेत. त्यामुळे यावेळचा 'पटलं तर घ्या विथ जयंती'चा भाग जबरदस्त असणार हे नक्की!

टॅग्स :पुष्कर श्रोत्री