Join us  

Pushpa 2 : बाबो..! ना ट्रेलर, ना प्रमोशन...; तरिही रिलीजआधीच ‘पुष्पा २’च्या हिंदी व्हर्जनने कमावले इतके कोटी...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 1:54 PM

Pushpa 2 : होय, अद्याप सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला नाही. रिलीज डेटही कन्फर्म नाही. मात्र त्याआधीच या सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली आहे.

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर फिल्म 'पुष्पा २' (Pushpa 2)ची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.  अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी मेकर्सनी 'पुष्पा २'चा टीझर रिलीज केला होता. पण अद्याप सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला नाही. रिलीज डेटही कन्फर्म नाही. मात्र त्याआधीच या सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली आहे.होय, रिपोर्टनुसार, ‘पुष्पा २’ अर्थात ‘पुष्पा: द रुल’च्या हिंदी व्हर्जनचे राईट्स २०० कोटींना विकले गेले आहेत. सिनेमाचे ऑडिओ राईट्सही ७५ कोटींना विकले गेले आहेत. म्हणजेच काय तर रिलीजआधीच ‘पुष्पा: द रुल’ने एकूण २७५ कोटींची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा २००० कोटींचा बिझनेस करेल, अशी आशा मेकर्सला आहे.‘पुष्पा २: द रुल’ची अद्याप रिलीज डेट कन्फर्म झालेली नाही. काही वृत्तानुसार, पुढील वर्षी हा सिनेमा रिलीज होईल.  

काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदानाच्या वाढदिवशी 'पुष्पा २' च्या टीझरची झलक दाखवणारा व्हिडीओ मेकर्सनी शेअर केला होता. या टीझरमध्ये दिग्दर्शक सुकुमार यांनी 'पुष्पा २'ची पहिली झलक चाहत्यांना दाखवली होती. 'पुष्पा' तिरुपती तुरुंगातून फरार असल्याचं यात दाखवण्यात आलं होतं. यानंतर अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला 'पुष्पा २'चा टीझर रिलीज केला होता.  पुष्पाराजच्या शोधात भटकत असलेल्या पोलिसांच्या हाती महिनाभरानंतर त्याचा एक व्हिडीओ लागतो. हा व्हिडीओ जंगलातील आहे. ८ गोळ्या लागल्यानंतरही पुष्पा जिवंत असल्याचं यात दिसतं. जंगलात प्राण्यांचे फोटो घेण्यासाठी लावलेल्या वनविभागाच्या कॅमेऱ्यात पुष्पा दिसतो. पुष्पाला पाहून वाघही दचकतो. 'पुष्पा २'मधील पुष्पाराजचा लुक पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. 

नव्याने शूट होणार सिनेमा?पहिल्या पार्टची कथा जिथे संपली, तिथून Pushpa 2: The Ruleची कथा सुरू होणार आहे. अर्थात हा सिनेमा कधी रिलीज होतोय, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. चर्चा खरी मानाल तर, आत्तापर्यंत शूट केलेल्या सीन्सबद्दल दिग्दर्शक सुकूमार समाधानी नाहीत. काही सीन्स रिशूट करण्याचा त्यांचा विचार आहे. असं झालं तर ‘पुष्पा 2’चं प्रदर्शन आणखी लांबणार आणि चाहत्यांची प्रतीक्षाही वाढणार. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा (Pushpa: The Rise - Part 1) या चित्रपटानं केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली होती. पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली आणि पुष्पाची केमिस्ट्री, या चित्रपटामधील गाणी, ॲक्शन सीन्सने नुसता धुमाकूळ घातला होता.

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुन