Join us  

Pushpa 2 Star Fees:अल्लू अर्जुननं घेतलेल्या मानधनाचा आकडा वाचून येईल भोवळ; पण अभिनेत्रीला मिळाले इतकेच पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 2:14 PM

Pushpa 2 Star Cast Fees: अल्लू अर्जुनचा सुपरहिट चित्रपट 'पुष्पा'च्या सिक्वेलवर जोरात काम सुरू आहे. त्याचबरोबर या चित्रपटाच्या स्टारकास्टच्या मानधनाबाबतही बातम्या समोर येत आहेत.

साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा 'पुष्पा द राइज' (Pushpa: The Rise) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आणि खूप प्रशंसा मिळवली. चित्रपटाच्या कथेसोबतच त्याच्या गाण्यांच्या हुक स्टेप्स जगभर प्रसिद्ध झाल्या. यासोबतच या चित्रपटाच्या सिक्वेलची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचवेळी, चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नुकतेच पुष्पा २ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यासाठी एका पूजेचेही आयोजन करण्यात आले होते, ज्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले. पहिल्या भागाचे नाव 'पुष्पा द राईज' तर दुसऱ्या भागाचे नाव 'पुष्पा द रुल' असे असेल. पुढील वर्षी जानेवारीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याची माहिती इन्स्टाग्रामवरील एका पेजवरून शेअर करण्यात आली आहे. दुसऱ्या भागाच्या स्टारकास्टबद्दल विविध बातम्या सध्या समोर येत आहेत.

अल्लू अर्जुन घेतोय १२५ कोटी मानधनअल्लू अर्जुन या चित्रपटासाठी १२५ कोटी घेत असल्याचे इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. त्याचवेळी सुकुमार ५० कोटी घेत आहे आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यासाठी ५ कोटी घेत आहे. हा चित्रपट जानेवारी महिन्यात जगभरातील पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनीही या पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. बहुतेक चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे सांगत आहेत.

सप्टेंबरपासून शूटिंगला होणार सुरूवातमीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुन सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पुष्पा २ च्या शूटिंगला सुरुवात करू शकतो. काही दिवसांनंतर रश्मिका मंदान्ना देखील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुष्पा द राइज २१ डिसेंबर, २०२१ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या तेलगू व्हर्जनने तर खळबळ उडवून दिली होतीच, शिवाय हिंदीतही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पारश्मिका मंदाना