Join us

'पुष्पा'ची माघार कोणाच्या पथ्यावर?

By संजय घावरे | Published: June 17, 2024 8:07 PM

आगामी सहा महिन्यांतील चित्रपटांच्या प्रदर्शनांच्या तारखांमध्ये मोठा उलटफेर

मुंबई - एका मेगा ब्लॅाकबस्टरच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या सिनेसृष्टीला 'पुष्पा २'ने मोठा धक्का दिला आहे. १५ आॅगस्टला रिलीज होणाऱ्या 'पुष्पा २'ने प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याने भारतीय सिनेसृष्टीत मोठी उलथापालथ झाली आहे. याचा परिणाम केवळ हिंदीच नव्हे, तर दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटांवरही होणार आहे.

पुन्हा एकदा भारतीय बॅाक्स आॅफिसवर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झालेल्या 'पुष्पा - द रूल'च्या फर्स्ट लूकने उत्सुकता वाढवली. टीझरमध्ये स्त्री वेषातील अल्लू अर्जुनचा अनोखा अंदाज दिसला. 'अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामी...' हे अल्लू-रश्मिका मंदानाच्या कपल साँगने धुमाकूळ घातला. एकीकडे प्रदर्शनाची तयारी सुरू असताना दुसरीकडे 'पुष्पा २'च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात येणार असल्याची कुजबुज सुरू झाली. कुजबुज खरी ठरली आणि  १५ आॅगस्टला 'पुष्पा २' येणार नसल्याचे नक्की झाले आहे. याचा परिणाम भारतीय सिनेसृष्टीतील इतर चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांवर झाला असून, पुढील सहा महिन्यांमधील चित्रपटांच्या प्रदर्शनात मोठा उलटफेर झाला आहे. 'पुष्पा २'च्या भीतीने ९ आणि २३ आॅगस्ट या १५ आॅगस्टच्या अगोदरच्या आणि नंतरच्या आठवड्यातील शुक्रवारी कोणत्याही मोठ्या निर्मात्याने प्रदर्शनाची योजना आखली नव्हती. इतकेच नव्हे तर मराठी चित्रपट निर्मात्यांनीही 'पुष्पा'चा धसका घेतला होता. २ आॅगस्ट रोजी 'द साबरमती रिपोर्ट' रिलीज झाल्यानंतर ९ आॅगस्ट रोजी एकही हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार नव्हता. २३ आॅगस्टलाही हेच दृश्य होते, पण आता या दोन तारखा इतर चित्रपटांसाठी मोकळ्या झाल्या आहेत. ........................- मुरली चटवाणी (मॅनेजिंग पार्टनर, पॅनोरमा स्टुडिओज डिस्ट्रीब्युशन)'पुष्पा'मुळे खूप मोठी उलथापालथ झाली आहे. ९ आणि २३ आॅगस्ट रोजी चित्रपट प्रदर्शनासाठी निर्माते प्रयत्न करत आहेत. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. 'स्त्री', 'वेदा' आणि 'खेल खेल में' हे तीन चित्रपट प्रीपोन होऊन १५ आॅगस्टला आले आहेत. 'पुष्पा २' न येण्याचा फायदा मराठी चित्रपटांनाही होणार असून, मराठी निर्मातेही या ९, १५ आणि २३ आॅगस्टची तयारी करत आहेत.........................फायदा कोणाला?'पुष्पा'ने माघार घेतल्याचा फायदा १५ आॅगस्टला येणाऱ्या श्रद्धा कपूर-राजकुमार रावचा 'स्त्री २', जॅान अब्राहम-शर्वरी वाघचा 'वेदा' आणि अक्षय कुमार-तापसी पन्नूच्या 'खेल खेल में' यांना होईल. याखेरीज पुरी जगन्नाथ दिग्दर्शित राम पोथिनेनी आणि संजय दत्त यांचा 'डबल इस्मार्ट' हा दाक्षिणात्य चित्रपट हिंदीसह पाच भाषांमध्ये येणार आहे...........................'तारीख पे तारीख'?टिझर आणि गाणे रिलीज केल्यानंतर 'पुष्पा'ची तारीख बदलण्यात आल्याचे ठोस कारण समजले नसले तरी चित्रपटाचे बरेच काम शिल्लक असल्याने हा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजते.........................कधी येणार 'पुष्पा २'?या वर्षाच्या उत्तरार्धातील सर्व चित्रपटांच्या प्रदर्शनाचे गणित बिघडवणाऱ्या 'पुष्पा २'च्या प्रदर्शनाची तारीख तूर्तास घोषित करण्यात आली नसली तरी, हा चित्रपट डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे..........................डिसेंबरमधील गणिते बदलणार!डिसेंबरमध्ये लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित विकी कौशलचा 'छावा' आणि आमिर खान प्रोडक्शनचा 'सितारे जमीं पर'च्या प्रदर्शनाची योजना आहे. 'पुष्पा २' येणार असल्यास ख्रिसमस आणि त्यापूर्वीचेही गणित बदलू शकते.

टॅग्स :पुष्पाबॉलिवूडTollywood